मृणाल दुसानिस लवकरच कमबॅक करणार? मालिका, सिनेमा की नाटक; स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 10:26 AM2024-03-25T10:26:28+5:302024-03-25T10:27:34+5:30

पती आणि एक वर्षांची लेक नूर्वीसह मृणाल कायमची भारतात परतली आहे.

marathi actress Mrunal Dusanis may comeback on screen soon shares her joy to be back in India | मृणाल दुसानिस लवकरच कमबॅक करणार? मालिका, सिनेमा की नाटक; स्वत:च केला खुलासा

मृणाल दुसानिस लवकरच कमबॅक करणार? मालिका, सिनेमा की नाटक; स्वत:च केला खुलासा

'माझिया प्रियाला प्रीत कळेना' मधून प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी अभिनेत्री मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis)  4 वर्षांनंतर भारतात परतली आहे. पती आणि लेकीसोबत ती अमेरिकेत स्थायिक झाली होती. मात्र आता जन्मभूमी नाशिकमधला फोटो पोस्ट करत तिने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. तसंच मृणाल आता भारतातच राहणार असून पुन्हा कामही सुरु करणार आहे. याविषयी ती काय म्हणाली वाचा.

'माझिया प्रियाला प्रीत कळेना','तू तिथे मी' या मालिकांमधून मृणाल दुसानिस घराघरात पोहोचली. 2018 साली आलेली 'हे मन बावरे' ही तिची शेवटची मालिका. ही मालिका संपेपर्यंत ती लग्न करुन अमेरिकेला स्थायिक झाली. तिने नुर्वी या गोंडस मुलीला जन्म दिला. आता मृणाल पती आणि लेकीसह तब्बल ४ वर्षांनी भारतात आली आहे. नाशिकमधील गोदाकाठ येथे सेल्फी शेअर करत तिने ही गुडन्यूज दिली. आता पुढील प्लॅनविषयी एबीपी माझाशी बोलताना ती म्हणाली, "इतक्या वर्षांनी पुन्हा मायदेशी परतल्यानंतर खूप आनंद होतोय. आता मी भारतातच राहणार आहे. माजी मुलगी नूर्वी दीडच वर्षांची आहे. ती तर पहिल्यांदाच भारतात आली आहे. माझी जन्मभूमी नाशिकमध्ये लेकीला फिरवताना मला खूप मजा आली. नूर्वीला पाणी बघायला खूप आवडतं. म्हणून आम्ही छान नदीकाठी बसलो, फोटो काढले."



पुन्हा काम सुरु करणार का? याविषयी बोलताना ती म्हणाली, "नक्कीच मला पुन्हा काम करायचं आहे. चाहते तर मला सतत परत कधी पडद्यावर दिसणार असं विचारत असतात. मी चांगली संधी शोधत आहे. मला सिनेमाही करायचा आहे. नाटकही करायला आवडेल. प्रायोगिक नाटकं तर मी केलीच आहेत आता व्यावयायिक नाटक करायचं आहे."

श्रेया बुगडे, सुकन्या मोने, नम्रता आवटे या अभिनेत्रींनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिचं स्वागत केलं आहे. मृणालला  पुन्हा काम करताना बघायची सर्वांचीच इच्छा आहे.

Web Title: marathi actress Mrunal Dusanis may comeback on screen soon shares her joy to be back in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.