मालिकांमध्ये का दिसत नाही? 'त्या' प्रश्नावर मनवा नाईकने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"क्षणभर विश्रांतीनंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 16:38 IST2026-02-06T16:36:19+5:302026-02-06T16:38:40+5:30
"त्याचं दु:ख आहे, पण...", मनवा नाईकने सांगितलं मालिकांमध्ये काम न करण्याचं कारण, म्हणाली...

मालिकांमध्ये का दिसत नाही? 'त्या' प्रश्नावर मनवा नाईकने स्पष्टच सांगितलं, म्हणाली-"क्षणभर विश्रांतीनंतर..."
Manava Naik: 'आभाळमाया', 'तुझं माझं जमेना' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी नायिका म्हणजे मनवा नाईक. तिने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली.मात्र, एका वेळेनंतर प्रियाने मालिकांमध्ये काम करणं सोडून दिलं. अभिनयानंतर आता मनवा निर्मिती क्षेत्राकडे वळली आहे. सध्याच्या घडीला ती मराठी कलाविश्वातील आघाडीची निर्माती म्हणून ओळखली जाते.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रियाने मालिकांमध्ये काम न करण्याचं कारण सांगितलं आहे.
नुकतीच मनवा नाईकने अमोल परचुरेंच्या कॅचअप मराठीला मुलाखत दिली.यादरम्यान तिला मालिकांमध्ये चांगल्या भूमिका केल्यानंतर मालिका करणं का बंद केलं असं विचारल्यावर ती म्हणाली," मला चांगले रोल्स मिळत नाहीत.यामागचं कारण काय आहे, हे मलाच कळालेलं नाही. ते माझं दु:ख आहे. पण, मला पुन्हा मालिकांमध्ये काम करायला आवडेल. तीन बहुराणीयॉं मालिकेनंतर मी खूप थकले.त्याच्यानंतर जास्त कालावधीच्या मालिका केल्याच नाहीत."
यापुढे अभिनेत्री मुलाखतीमध्ये म्हणाली,"तुझं माझं जमेना ही मालिका मी केली पण, ती कमी कालावधीची मालिका होती. शिवाय मागच्या वर्षी मी काळी राणी नावाचं नाटक केलं. त्यामुळे जर चांगली भूमिका असेल तर नक्कीच मला काम करायला आवडेल."
दोन-तीन सिनेमे मी केले पण...
मग मनवा म्हणाली,"मी नेहमी म्हणते की, अभिनय माझी आवड आहे. त्यामुळे हे काम करताना मजा आली पाहिजे, असं मला वाटतं.आजवर मी जी काही नाटकं केली त्यातील माझ्या भूमिका उत्तम होत्या. बरं, त्याच्यात मी डान्स नंबर्स करु शकत नाही.मी त्याच्यासाठी बनलेच नाही. त्यात लावणी वगैरे असेल तर मला ते जमत नाही. अशा गोष्टींमुळे काम केलं नाही. क्षणभर विश्रांतीनंतर दोन-तीन सिनेमे मी केले पण ते रिलीज झाले नाहीत. पण, मला अभिनय आवडतो आणि चांगली भूमिका जर माझ्याकडे आली तर ती मी नक्कीच करेन." असा खुलासा अभिनेत्रीने या मुलाखतीत केला.