टॅलेंटेड मनवा नाईक! मराठी अभिनेत्रीने स्वत:च्या हाताने घडवली मातीपासून बाप्पाची मूर्ती, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 10:41 IST2025-08-26T10:40:19+5:302025-08-26T10:41:16+5:30
दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात. अनेक कलाकार स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवतात. अभिनेत्री मनवा नाईक हिनेदेखील यंदा स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे.

टॅलेंटेड मनवा नाईक! मराठी अभिनेत्रीने स्वत:च्या हाताने घडवली मातीपासून बाप्पाची मूर्ती, पाहा फोटो
दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. अवघ्या एक दिवसावर आता गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. दरवर्षी सेलिब्रिटीही मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करतात. अनेक कलाकार स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवतात. अभिनेत्री मनवा नाईक हिनेदेखील यंदा स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मूर्ती बनवली आहे.
मनवा नाईकने मातीपासून गणरायाची छोटीशी क्यूट मूर्ती बनवली आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत. एका वर्कशॉपमध्ये मनवाने ही गणपती बाप्पाची ही मूर्ती घडवली आहे. "मातीपासून गणपती बनवला", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. मनवा नाईकच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, मनवा नाईक ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आभाळमाया, तुमची मुलगी काय करते अशा मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बा, बहु और बेबी' या हिंदी मालिकेतील तिची भूमिकाही गाजली होती. अनेक सिनेमांमध्येही मनवा महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. तर अभिनेत्री असण्यासोबतच मनवा दिग्दर्शिकदेखील आहे.