अरुंधती अन् तिच्या लेकीने केला अक्षय कुमारच्या 'बाला'वर डान्स; पाहा मधुराणीचा हा हटके व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 04:26 PM2022-03-18T16:26:20+5:302022-03-18T16:27:05+5:30

Madhurani gokhale-prabhulkar: अलिकडेच मधुराणीच्या लेकीचा स्वरालीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मधुराणी आणि तिच्या लेकीने अक्षय कुमारच्या 'बाला' या गाण्यावर भन्नाट डान्स केला.

marathi actress madhurani gokhale prabhulkar share dance video on akshay kumar bala song | अरुंधती अन् तिच्या लेकीने केला अक्षय कुमारच्या 'बाला'वर डान्स; पाहा मधुराणीचा हा हटके व्हिडीओ

अरुंधती अन् तिच्या लेकीने केला अक्षय कुमारच्या 'बाला'वर डान्स; पाहा मधुराणीचा हा हटके व्हिडीओ

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले- प्रभुलकर. या मालिकेत तिने साकारलेल्या आदर्श स्त्रीच्या भूमिकेमुळे ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिकेमध्ये अरुंधती प्रचंड साधी, शांत स्वभावाची असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, खऱ्या आयुष्यात अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रचंड वेगळी आहे.

कलाविश्वाप्रमाणेच मधुराणी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. यात ती कधी सेटवरचे फोटो शेअर करते. तर कधी तिच्या वैयक्तिक जीवनातील, तिच्या कविता वाचनाचे  व्हिडीओ, फोटो शेअर करत असते. परंतु, यावेळी तिने चक्क डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.

अलिकडेच मधुराणीच्या लेकीचा स्वरालीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मधुराणी आणि तिच्या लेकीने अक्षय कुमारच्या बाला या गाण्यावर भन्नाट डान्स केला. सध्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसंच मधुराणीचं हे नवं रुपही नेटकऱ्यांना विशेष आवडत आहे.
 

Web Title: marathi actress madhurani gokhale prabhulkar share dance video on akshay kumar bala song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.