"तेव्हा स्वामींनी वाचवलं...", मराठी अभिनेत्रीनं सांगितला स्वामी भक्तीचा अनोखा अनुभव; म्हणाली-"प्रेग्नन्सीदरम्यान…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:51 IST2025-11-10T11:49:12+5:302025-11-10T11:51:17+5:30
"दोनदा मिसकॅरेज झालेलं अन्...", मरणाच्या दारातून परतली अभिनेत्री! सांगितला 'तो' प्रसंग

"तेव्हा स्वामींनी वाचवलं...", मराठी अभिनेत्रीनं सांगितला स्वामी भक्तीचा अनोखा अनुभव; म्हणाली-"प्रेग्नन्सीदरम्यान…"
Swati Deval: दत्तगुरूंचे तिसरे अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांचे अनुभव हजारो लोकांना येत असतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा प्रचंड विश्वास स्वामीभक्तांना विविधांगी प्रचिती, अनुभव यामुळे येतो आणि तो अधिकाधिक दृढ होतो. मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार हे स्वामीभक्त आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री स्वाती देवल. श्री स्वामी समर्थांवरील याच श्रद्धमुळे या अभिनेत्रीला देखील तिच्या कठीण काळात अनोखा अनुभव आला.
नुकतीच स्वामी देवलने इट्स मज्जा ला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या प्रेग्नन्सीं काळाविषयी सांगितलं. प्रेग्नन्सीदरम्यान ती मरणाच्या दारातून परत आली, असंही अभिनेत्रीने यावेळी म्हटलं. त्यावेळी स्वाती म्हणाली की, "स्वराध्यच्या आधी माझं दोनदा मिसकॅरेज झालेलं, एकदा प्रेग्नन्सी झालेली मोठी. सातव्या महिन्यात माझी प्रेग्नन्सी झालेली आणि त्या सगळ्या मोठ्या परिस्थितीतून मी वर आले. तेव्हा मी स्वामींचा जप करतच हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि स्वामींचा जप करतच बाहेर आले. तेव्हासुद्धा स्वामींनी वाचवलं, मी त्यावेळी काळी-निळी झाले होते. डॉक्टरांनी सांगिलेलं तुषारला की, माहिती नाही हिचं काय होईल, तुम्ही सह्या द्या. त्याने थरथरत सह्या केल्या होत्या. तेव्हासुद्धा त्यांनीसुद्धा महाराजांचं स्मरण केलेलं. सहाव्या महिन्यात समजतं की, बाळाचे सगळे अवयव चांगले आहेत. स्वराध्यच्या वेळेला ती ऐकेपर्यंत माझ्या जीवात जीव नव्हता. तेव्हा मी स्वामींचं कॉइन आहे आणि दत्तगुरुंचा कॉइन चांदीचं हे मी हातात पकडून सोनोग्राफीला गेले होते. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं, बाळ चांगलं आहे.त्यावेळी तिथून बाहेर आल्यानंतर मी जप करत होते, बाळ चांगलं असुदे बाकी सगळं नंतर बघू.कारण आधीचे अनुभव वाईट होते." असं पुढे स्वातीनं सांगितलं.
मग पुढे अभिनेत्रीने सांगितलं,"महाराज हे प्रत्येकवेळेला बरोबर असतात, याची मला अनुभूती आली. मी बऱ्याचदा वाडीला जाते. तिथे दिगंबर पुजारींचं मोठं घर आहे. तिथेच गुरुप्रसाद पुजारीही आहेत, त्यांचेच पुत्र. त्यांना मी गुरु मानते. आम्ही नेहमी त्यांच्याकडे जातो. एकदा त्यांनी मला सांगितलेलं, तुमच्या दादर येथील मठात दर शनिवारी जा, काहीही मागू नकोस, काहीही बोलू नको, फक्त नमस्कार कर...तोरण ठेव...लक्ष ठेवा असंही म्हणू नकोस कारण, स्वामींचं लक्ष आहे. ११ वेळा असं कर. माझे शेवटचे २ शनिवार बाकी होते, माझी तब्येत बिघडली. त्यावेळी मला नवरा म्हणाला, घरात बस! महाराजांचं नामस्मरण कर. अचानक एका व्यक्ती दुपारी पादुका आणि रिसीट घेऊन आला. तर मी त्यांना म्हटलं मी नाही पैसे भरले, तर तो म्हणाला तुमच्याचसाठी आहेत, पाठवल्या आहेत. मी त्या घेतल्या. एक दिवस १५००ची पावती मी त्या माणसाच्या नावाने स्वामींच्या चरणी ठेवली." असा किस्सा स्वाती देवलने मुलाखतीत सांगितला.