जुई गडकरीची पहिली कमाई किती होती माहितीये? खुलासा करत म्हणाली…
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 13:22 IST2024-01-14T13:19:50+5:302024-01-14T13:22:53+5:30
आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

जुई गडकरीची पहिली कमाई किती होती माहितीये? खुलासा करत म्हणाली…
मराठी मालिकाविश्वात तुफान नेम आणि फेम मिळवलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी अभिनेत्री जुई गडकरी सतत चर्चेत येत असते. दिवसेंदिवस जुई यशाचं शिखर गाठत आहे. पण, तुम्हाला माहिती आहे का आज लाखो रुपये कमवत असलेल्या जुई गडकरीची पहिली कमाई किती होती?. तर स्वत: च्या पहिल्या कमाईबद्दल अभिनेत्रीनं खुलासा केला.
अलिकडेच जुईने इन्स्टाग्रामवर ‘Ask me a Question’ हे सेशन ठेवलं होतं. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला तुझी पहिली कमाई किती होती, हा प्रश्न केला. यावर उत्तरात ती म्हणाली, 'माझी पहिली कमाई आठशे रुपये होती. दुसरीत असताना मी शोमध्ये गायले होते. तेव्हा त्याचे आठशे रुपये मिळाले होते. आठशेपैकी पाचशे रुपये पैशाच्या स्वरुपात आणि उरलेल्या तीनशे रुपयांचं बक्षिस मिळालं होतं'.
जुई सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आज जुईकलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जुईने याआधी तिने "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजविण सख्या रे…' आणि 'पुढचं पाऊल यात झळकली आहे. शिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.