चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना जुई गडकरीने सांगितलं तिचं खरं वय, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 09:03 IST2024-11-27T09:02:28+5:302024-11-27T09:03:46+5:30
नेटकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना जुई गडकरीने तिचं खरं वय सांगितलं.

चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना जुई गडकरीने सांगितलं तिचं खरं वय, जाणून घ्या...
मराठी मालिकाविश्वात तुफान नेम आणि फेम मिळवलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी (jui gadkari). आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मराठी अभिनेत्री जुई गडकरी सतत चर्चेत येत असते. उत्तम अभिनयशैली आणि सोज्वळपणा यांच्या जोरावर दिवसेंदिवस जुई यशाचं शिखर गाठत आहे. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायम त्यांच्या संपर्कात राहते.
अलिकडेच जुईने इन्स्टाग्रामवर 'Ask me a Question' हे सेशन ठेवलं होतं. यावेळी तिनं चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला 'ताई, तुमचं वय काय? तुम्ही इतक्या गोड आहात की कळत नाही' असा प्रश्न केला. यावेळी तिनं या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतलं. जुईने ती ३६ वर्षांची असून तिला आता ३७ वं वर्ष चालू असल्याचं चाहत्याला दिलेल्या उत्तरात सांगितलं आहे.
सध्या जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सायलीच्या भूमिकेत दिसत आहे. याबरोबरच जुई सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळेदेखील चर्चेत असते. अनेकदा ती तिचे फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. जुई याआधी "श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजविण सख्या रे…' आणि 'पुढचं पाऊल यात झळकली आहे. शिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती.