हृता दुर्गुळेने का नाकारली बिग बॉसची ऑफर? अभिनेत्री म्हणाली- "मी त्या शोसाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 13:02 IST2024-11-01T13:01:31+5:302024-11-01T13:02:02+5:30

हृता दुर्गुळेने आलेली बिग बॉसची ऑफर का स्वीकारली नाही, याचा खुलासा तिने केलाय (hruta durgule)

marathi actress hruta durgule rejected bigg boss offer | हृता दुर्गुळेने का नाकारली बिग बॉसची ऑफर? अभिनेत्री म्हणाली- "मी त्या शोसाठी..."

हृता दुर्गुळेने का नाकारली बिग बॉसची ऑफर? अभिनेत्री म्हणाली- "मी त्या शोसाठी..."

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. 'फुलपाखरु', 'मन उडू उडू झालं' अशा मालिकांमधून  हृताने मालिकाविश्व गाजवलं. याशिवाय 'टाईमपास ३', 'अनन्या', 'कन्नी' अशा सिनेमांमधून हृताने सिनेइंडस्ट्रीतही स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. हृता सध्या हिंदी वेबसीरिजमध्येही काम करत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत हृताने तिला आलेल्या बिग बॉस ऑफरविषयी खुलासा केलाय.

हृताने का नाकारली बिग बॉसची ऑफर?

हृताने द मोटर माऊथ शो या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत याविषयी खुलासा केला होता. हृताला बिग बॉसची ऑफर मिळालीय का याविषयी विचारण्यात आलं. तेव्हा हृता म्हणाली, "मला याआधी बिग बॉसची ऑफर मिळाली होती पण मी या शो साठी बनली नाही असं मला वाटतं. मी जर बिग बॉसमध्ये गेली तर फक्त रडेल." असा खुलासा हृताने केलाय. याचाच अर्थ हृताला बिग बॉसची ऑफर मिळाली होती. पण तिने ती नाकारली.


हृता दुर्गुळेचं वर्कफ्रंट

हृता दुर्गुळे सध्या विविध मराठी सिनेमे आणि हिंदी वेबसीरिजमध्ये व्यस्त आहे. 'दुर्वा' या मालिकेतून हृताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे 'फुलपाखरु' आणि 'मन उडू उडू झालं' या हृताच्या मालिका खूप गाजल्या. त्यानंतर हृताने सिनेइंडस्ट्रीत स्वतःचा मोर्चा वळवला. 'सर्कीट', 'टाईमपास ३', 'कन्नी', ''अनन्या' अशा सिनेमांमधून हृताने काम केलं. काहीच दिवसांपूर्वी हृताची भूमिका असलेली 'कमांडर करण सक्सेना' ही हिंदी वेबसीरिज लोकप्रिय झाली.

 

Web Title: marathi actress hruta durgule rejected bigg boss offer