Cutest Couple : हृता दुर्गळेच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण, शेअर केला रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:55 PM2022-02-25T12:55:29+5:302022-02-25T12:57:38+5:30

Hruta Durgule : नुकताच हृता दुर्गुळे चा साखरपुडा झाला. आज साखरपुड्याला दोन महिने पूर्ण झालेत. मग काय, सेलिब्रेशन तो बनता ही है...

marathi actress hruta durgule celebrate 2 months of our engagement share post | Cutest Couple : हृता दुर्गळेच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण, शेअर केला रोमॅन्टिक फोटो

Cutest Couple : हृता दुर्गळेच्या साखरपुड्याला दोन महिने पूर्ण, शेअर केला रोमॅन्टिक फोटो

googlenewsNext

‘फुलपाखरू’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळे  (Hruta Durgule) हिला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळाला आहे. नुकताच तिचा साखरपुडा झाला. आज साखरपुड्याला दोन महिने पूर्ण झालेत. मग काय, सेलिबे्रशन तो बनता ही है...
साखरपुड्याला दोन महिने पूर्ण झाल्याच्या आनंदात  हृता दुगुर्ळेने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
 हृता तिचा आणि होणारा नवरा प्रतीकचा एक सुंदर रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत, ‘हॅप्पी 2 मंथ’, अशा शब्दांत हृताने प्रतीकला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही कमेंट्स करत या कपलला  खास क्षणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या डिसेंबर महिन्यात हृताने प्रतीक शाहसोबत साखरपुडा केला होता. प्रतीक शाह हा एक दिग्दर्शक आहे. प्रतीकने अनेक हिंदी मालिकांच दिग्दर्शन केलं आहे.  बेहद 2, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी या मालिका त्याने दिग्दर्शित केल्या आहेत.

आपल्या सौदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृता दुगुर्ळेने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर हृताचा मोठा चाहतावर्ग आहे. महत्वाचे म्हणजे सोशल मीडियावर सक्रीय असणारी हृता नेहमी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. याच माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सध्या हृता ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे.  

Web Title: marathi actress hruta durgule celebrate 2 months of our engagement share post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.