'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने उरकला साखरपुडा? अंगठी दाखवत म्हणाली, 'हे घडतंय...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 13:08 IST2023-09-24T13:07:54+5:302023-09-24T13:08:48+5:30

त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

marathi actress gauri kulkarni worked in aai kuthe kay karte serial shows off ring fans asked if she is engaged | 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने उरकला साखरपुडा? अंगठी दाखवत म्हणाली, 'हे घडतंय...'

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने उरकला साखरपुडा? अंगठी दाखवत म्हणाली, 'हे घडतंय...'

'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका. वेगळ्या धाटणीच्या स्टोरीमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली. कित्येक काळ ही मालिका टीआरपीमध्ये नंबर १ वर होती. मालिकेतील सर्वच कलाकारांना लोकप्रियता मिळाली. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे गौरी कुलकर्णी (Gauri Kulkarni). सध्या गौरीच्या लेटेस्ट पोस्टमुळे तिच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. 

गौरी  कुलकर्णीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कालच तिने आपला वाढदिवस साजरा केला. तर आज तिने एक फोटो शेअर करत चाहत्यांना संभ्रमात टाकलंय. होय, गौरीने बोटातील अंगठी दाखवत फोटो पोस्ट केला आहे. 'Its Happening' असं कॅप्शनही तिने दिलं आहे. साहजिकच आहे गौरीचा साखरपुडा झाला की काय असा संशय तिच्या चाहत्यांना आलाय.

गौरीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत प्रश्न विचारलेत. इतकंच नाही तर तिला थेट शुभेच्छाही दिल्यात. 'लग्न कधी आहे?','कोण आहे तो फोटो टाक ना साखरपुड्याचे..'अशा कमेंट्स केल्या आहेत. गौरीने नक्की साखरपुडा झाला आहे की नाही याबद्दल काहीच सांगितलेलं दिसत नाही. मात्र अंगठीचा फोटो शो ऑफ करत ती लवकरच मोठी बातमी शेअर करेल असं वाटतंय. आता खरंच साखरपुडा झालाय की काही पब्लिसिटी स्टंट आहे हे लवकरच कळेल.

गौरी कुलकर्णी ही मूळची बीडची आहे. आई कुठे काय करते मालिकेत गौरीने यशच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. मात्र तिने काहीच दिवसात ही मालिका सोडली. तरी या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. आपल्या गोड चेहऱ्याने तिने सर्वांनाच प्रेमात पाडलं. सध्या गौरी 'प्रेमास रंग यावे' मालिकेत दिसत आहे.

Web Title: marathi actress gauri kulkarni worked in aai kuthe kay karte serial shows off ring fans asked if she is engaged