मांडीवर बसलेली निळू फुले यांची लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'राजा रानीची गं जोडी'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 03:35 PM2022-07-15T15:35:12+5:302022-07-15T15:36:01+5:30

Gargi phule: नव्या ट्रेंडमध्ये एक ट्रेंड आजही कायम आहे तो म्हणजे बालपणीचे फोटो शेअर करण्याचा आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

marathi actress gargi phule childhood photo with father nilu phule | मांडीवर बसलेली निळू फुले यांची लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'राजा रानीची गं जोडी'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

मांडीवर बसलेली निळू फुले यांची लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'राजा रानीची गं जोडी'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

googlenewsNext

सोशल मीडियावर दररोज नवनवीन ट्रेंड व्हायरल होत असतात त्यामुळे हे ट्रेंड सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण फॉलो करतात. या सगळ्या नव्या ट्रेंडमध्ये एक ट्रेंड आजही कायम आहे तो म्हणजे बालपणीचे फोटो शेअर करण्याचा आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात सध्या एका अशाच अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री एका दिग्गज अभिनेत्याची लेक आहे.

बरेच कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत असतात. तर, काही जण पुन्हा एकदा त्या मेमरीमधून त्यांचं बालपण जगत असतात. म्हणून, फादर्स डे, मदर्स डे वा चिड्रन्स डे असला की सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीही त्यांच्या बालपणीचे किंवा कॉलेजजीवनातील फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर करतात. सध्या अभिनेत्री गार्गी फुले (gargi phule) यांचा फोटो व्हायरल होत आहे.

बेबी मावशी ते राजश्री वहिनी! ‘राजा रानीची ग जोडी’ मधील कलाकारांचे रिअल लाईफ पार्टनर
 

'राजा रानीची गं जोडी' (raja rani chi g jodi) या मालिकेच्या माध्यमातून दररोज चाहत्यांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे गार्गी फुले. या मालिकेत बेबी मावशी ही भूमिका साकारणारी गार्गी, ज्येष्ठ अभिनेता निळू फुले (nilu phule) यांची लेक आहे. गार्गी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात. मात्र,यावेळी वडिलांसोबतचा फोटो शेअर करत त्यांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये त्या वडिलांच्या म्हणजेच निळू फुले यांच्या मांडीवर बसल्याचं दिसून येत आहे. बापलेकीचा हा गोड फोटो सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गार्गी फुले या आपल्या वडिलांप्रमाणेच उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांनी तुला पाहते रे, राजा रानीची गं जोडी अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

Web Title: marathi actress gargi phule childhood photo with father nilu phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.