"स्वत:कडे न बघता लोक इतरांना...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्यानं सुनावलं, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 13:11 IST2026-02-03T13:06:34+5:302026-02-03T13:11:12+5:30

"एका फोटोवरून त्या व्यक्तीला जज करणं...", ट्रोलर्सना ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्यानं चांगलंच सुनावलं, म्हणाला-"त्या प्रवृत्तीबद्दल..."

marathi actress dnyanada ramtirthkar and harshad atmaram talk about on trolling  | "स्वत:कडे न बघता लोक इतरांना...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्यानं सुनावलं, म्हणाला...

"स्वत:कडे न बघता लोक इतरांना...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना ज्ञानदाच्या होणाऱ्या नवऱ्यानं सुनावलं, म्हणाला...

Dnyanada Ramtirhkar And Harshad Gaikwad On Trolling: अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या ज्ञानदा  रामतीर्थकर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतून प्रेक्षकाचं मनोरंजन करते. अलिकडेच महिनाभरापूर्वी म्हणजेच  २०२५ च्या वर्षाखेरीस ज्ञानदाने चाहत्यांना सुखद धक्का दिला. सोशल मीडियावर अभिनेत्रीने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत कित्येक चाहत्यांना सरप्राईज दिलं. आता लवकरच ती सिनेमॅटोग्राफर हर्षद आत्मारामसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

ज्ञानदा आणि हर्षद यांची पहिली भेट २०१५ मध्ये एका शॉर्ट फिल्मच्या शूटिंगवेळी झाली. त्यानंतर दोघांची मैत्री आणि या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नासाठी प्रपोज केलं. दोघांच्या वयामध्ये ७ वर्षांचं अंतर आहे. नुकताच त्यांचा साखरपुडा पार पडला. मात्र, सोशल मीडियावर ज्ञानदा-हर्षदच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होताच त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. नुकत्याच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानदा आणि तिचा होणारा पती हर्षदन त्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे. यावेळी हर्षद म्हणाला,"स्वभावाचं आपण काहीच करु शकत नाही.हल्ली सगळ्यांकडे फोन आहे, सोशल मीडिया आहे .सगळ्यांनाच आपली मतं आहेत. स्वत:कडे न बघता लोकांना इतरांकडे बघायचं असतं. या प्रवृत्तीबद्दल काहीच बोलू शकत नाही. मला असं वाटतं, मुळात आपल्या समाजाचीच अशी विचारधारा आहे. एखाद्याच्या दिसण्यावरून बोललेलं आपण समजू शकतो. पण, कास्टवर जेव्हा लोक प्रश्न उपस्थित करतात किंवा बोलतात त्या गोष्टीचा राग येतो."

यापुढे हर्षद म्हणाला,"मला वाटतं आज आम्ही ज्या ठिकाणी आहोत, आम्हाला कधीच या गोष्टीमुळे फरक पडला नाही. शिवाय आमचे कुटुंबीय किंवा मित्र-मंडळींना देखील यामुळे काही फरक पडत नाही. एकदा तर माझ्या आईने एका कमेंट्ला रिप्लाय देत म्हणालेली,"मूर्ख आहेस तू..."असं म्हणत तिने समोरच्या व्यक्तीला सुनावलं होतं.  मी आईला म्हटलं,'तू याचा विचार करणं सोडून दे... त्यांना उलट हेच हवं असतं.' याआधी देखील ज्ञानदाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून काही ना काही कमेंट्स यायच्या. पण, मी तिला सुद्धा हेच सांगायचो की यामुळे डिस्टर्ब होऊ नको. त्यामुळे माझ्यासाठी ही आधीच उजळणी झाली आहे."

मग ज्ञानदा म्हणाली,"मुळात एक फोटो बघून तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसं जज करु शकता.  हर्षदच्या बाबतीत असं आहे की तो कधीच कॅमेरासमोर आला नाही. तो माणूस म्हणून कसा आहे? तो कोण आहे? तो काय करतो, त्याची बॅकग्राउंड काय आहे? काहीच गोष्ट तु्म्हाला माहीत नसताना तु्म्ही कसं काय बोलू शकता.यावर आपण काहीच करु शकत नाही. तुम्हाला तुमची मतं मांडायची आहेत तर खुशाल मांडा.आम्हाला सत्य काय माहीत आहे. त्यामुळे आम्ही शांत राहणं पसतं करतो."असं मत ज्ञानदाने मुलाखतीत मांडलं. 

Web Title : ज्ञानदा के मंगेतर ने दिखावे की आलोचना करने वालों को चुप कराया।

Web Summary : अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर और सिनेमैटोग्राफर हर्षद गायकवाड़ की सगाई के बाद उन्हें ट्रोल किया गया। हर्षद ने दिखावे और जाति के आधार पर आंकने की निंदा की, अपने परिवार के समर्थन पर जोर दिया और नकारात्मकता को खारिज कर दिया। ज्ञानदा ने जल्दबाजी में फैसले के पीछे अज्ञानता को उजागर किया।

Web Title : Dnyanada's fiance silences trolls criticizing their appearance, relationship.

Web Summary : Actress Dnyanada Ramtirhkar and cinematographer Harshad Gaikwad faced trolling after their engagement. Harshad condemned judging based on appearance and caste, emphasizing their family's support and dismissing negativity. Dnyanada highlighted the ignorance behind snap judgments.