'गणेशोत्सवाचं स्वरुपही बदलल, पण..'; धनश्री काडगांवकरने दिला माहेरच्या आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:05 AM2022-08-31T11:05:37+5:302022-08-31T11:06:23+5:30

Dhanashri Kadgaonkar: धनश्रीने तिच्या गणेशोत्सवाच्या काळातील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

marathi actress Dhanashri Kadgaonka Bring back Ganesh Chaturthi old memories | 'गणेशोत्सवाचं स्वरुपही बदलल, पण..'; धनश्री काडगांवकरने दिला माहेरच्या आठवणींना उजाळा

'गणेशोत्सवाचं स्वरुपही बदलल, पण..'; धनश्री काडगांवकरने दिला माहेरच्या आठवणींना उजाळा

googlenewsNext

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे.  सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने मोठ्या थाटात गणरायाचं स्वागत केलं आहे. त्यामुळे सध्या वातावरणात प्रसन्नता, मांगल्य पसरल्याचं दिसून येत आहे. यात अनेक कलाकार त्यांच्या गणेशोत्सवाच्या काळातील काही बालपणीच्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. यामध्येच 'तू चाल पुढं' (tu chal pudha) मालिकेतील शिल्पी अर्थात अभिनेत्री धनश्री काडगांवकर (Dhanashri Kadgaonkar) हिने तिच्या गणेशोत्सवाच्या काळातील बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

"लहानपणीपासून ते अगदी आतापर्यंत आमच्याकडे गणपती येण्याच्या १० ते १५ दिवसांपासूनच लगबग सुरु होते. माझ्या माहेरी गौरी गणपती असल्यामुळे सजावट, बाप्पाला घरी आणणं, मोदकांसह वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ तयार करणं हे सारं काही आम्ही मिळून एकत्र करायचो.  सगळं वातावरण आनंदाने भरलेलं असायचं", असं धनश्री म्हणाली.

पुढे ती म्हणते, "लहान असताना गणेशोत्सवानिमित्त सोसायटीमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचे. तेथेच मला माझ्यातील कलाकाराची ओळख झाली असं मला वाटतं. वेळ बदलत गेली त्यानुसार गणेशोत्सवाचं स्वरुपही बदललं.पण, आजही मी लहानपणीसारखाच गणेशोत्सवाचा आनंद साजरा करते."

दरम्यान, 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत नंदिनी ही भूमिका साकारुन धनश्रीने विशेष लोकप्रियता मिळवली. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं त्यामुळे आज छोट्या पडद्यावरील वहिनीसाहेब या नावाने ती ओळखली जाते. विशेष म्हणजे 'तू चाल पुढं' या मालिकेतील तिची शिल्पी ही भूमिकाही गाजताना दिसत आहे.
 

Web Title: marathi actress Dhanashri Kadgaonka Bring back Ganesh Chaturthi old memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.