प्रसिद्ध अभिनेत्रीची जुळ्या मुलींसोबत एकाच मालिकेत वर्णी, मायलेकींची सोशल मीडिया पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 14:35 IST2024-03-06T14:34:33+5:302024-03-06T14:35:36+5:30

मालिकाविश्वात असं पहिल्यांदाच घडत असेल ज्यात एका अभिनेत्रीच्या जुळ्या मुलीही आईच्या मालिकेत एन्ट्री घेत आहेत.

marathi actress and her twins to be seen in upcoming marathi serial first time working together | प्रसिद्ध अभिनेत्रीची जुळ्या मुलींसोबत एकाच मालिकेत वर्णी, मायलेकींची सोशल मीडिया पोस्ट

प्रसिद्ध अभिनेत्रीची जुळ्या मुलींसोबत एकाच मालिकेत वर्णी, मायलेकींची सोशल मीडिया पोस्ट

मराठी टेलिव्हिजनविश्वात सध्या अनेक नव्या मालिका येत आहेत. बऱ्याच मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तर काही नव्या मालिका येण्यास सज्ज आहेत. विशेष म्हणजे मालिकाविश्वात आता असं पहिल्यांदाच घडत असेल ज्यात एका अभिनेत्रीच्या जुळ्या मुलीही आईच्या मालिकेत एन्ट्री घेत आहेत. होय आई आणि जुळ्या मुली अशा तिघींना एकाच मालिकेत पाहण्याची पर्वणीच चाहत्यांना मिळाली आहे. कोण आहे ती अभिनेत्री?

लोकप्रिय 'लागिरं झालं जी' मालिकेतील पुष्पा मामी आठवताएत का? अभिनेत्री विद्या सावळे (Vidya Sawle)यांनी ही भूमिका साकारली होती. आता सन मराठी वाहिनीवर 'काँस्टेबल मंजू' ही मालिका लवकरच सुरु होणार आहे. यामध्ये विद्या सावळे मम्मीसाहेब ही भूमिका साकारणार आहेत. विद्या यांना जुळ्या मुली आहेत. नेहा (Neha) आणि निकीता (Nikita)अशी त्यांची नावं आहेत. या दोघीही मालिकेत झळकणार आहेत. सवी आणि कवी अशा व्यक्तिरेखा त्या साकारणार आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच मायलेकी एखाद्या मालिकेत एकत्र दिसणार आहेत. विद्या सावळे यांनी लिहिले, 'काँस्टेबल मंजूमध्ये मला आणि माझ्या ट्वीन्सला बघायला विसरु नका.'

विद्या सावळे या एकट्याच दोन्ही मुलींचा सांभाळ करतात. नेहाने याआधी 'सिंधुताई माझी आई' मालिकेत छोटी भूमिका साकारली होती. नेहा आणि निकीता दोघीही सोशल मीडियावर सक्रीय असतात. दोघीही उत्तम डान्सरही आहेत आणि त्यांचे डान्स व्हिडिओ व्हायरल होत असतात. 'काँस्टेबल मंजू' ही मालिका 18 मार्चपासून रात्री 8 वाजता सन मराठीवर प्रक्षेपित होणार आहे. 

Web Title: marathi actress and her twins to be seen in upcoming marathi serial first time working together