साधी साडी, हाती भगवा पताका अन् वारकऱ्यांसोबत पंढरीच्या वाटेवर पावलं; अमृता धोंगडेने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:17 IST2025-06-25T12:17:06+5:302025-06-25T12:17:28+5:30

यंदा अनेक सेलिब्रिटीही वारीमध्ये सहभागी झाले आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम अमृता धोंगडेनेही वारीमध्ये सहभाग घेतला होता.

marathi actress amruta dhongade in pandharichi wari ashadhi ekadashi video | साधी साडी, हाती भगवा पताका अन् वारकऱ्यांसोबत पंढरीच्या वाटेवर पावलं; अमृता धोंगडेने जिंकली मनं

साधी साडी, हाती भगवा पताका अन् वारकऱ्यांसोबत पंढरीच्या वाटेवर पावलं; अमृता धोंगडेने जिंकली मनं

"पाऊले चालती पंढरीची वाट..." असं म्हणत वारकऱ्यांची पावलं हळूहळू पंढरीच्या दिशेने त्यांच्या विठुमाऊलीला पाहण्यासाठी सरकत आहेत. दरवर्षी होणारा हा नयनरम्य वारीचा सोहळा प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात अनुभवावा. यंदा अनेक सेलिब्रिटीही वारीमध्ये सहभागी झाले आहेत. बिग बॉस मराठी फेम अमृता धोंगडेनेही वारीमध्ये सहभाग घेतला होता. 

अमृता आणि अभिनेता अजिंक्य राऊत झी टॉकीजवरील मन मंदिरा गजर भक्तीचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने वारीमध्ये सहभागी झाले होते. अमृताने अगदी साधी साडी नेसली होती. वारीत सहभागी होत दोघांनीही वारकऱ्यांसोबत टाळ-मृदुंगावर ताल धरला. डोईवर तुळस आणि हाती भगवा पताका घेत अमृता वारकऱ्यांच्या दींडीत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. या अविस्मरणीय क्षणांचा व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. 


दरम्यान, अमृता धोंगडेने झी मराठी वाहिनीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मुख्य भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली. 'तू चांदणे शिंपीत जा', 'शिवा' या मालिकेतही ती दिसली होती. 'बिग बॉस मराठी ३' मध्येही अमृता सहभागी झाली होती. 

Web Title: marathi actress amruta dhongade in pandharichi wari ashadhi ekadashi video