शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 04:49 PM2023-11-18T16:49:17+5:302023-11-18T16:52:26+5:30

अमृता देशमुख-प्रसाद जवादेने बांधली लग्नगाठ, शाही विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल

marathi actress amruta deshmukh tie knot with actor prasad jawade wedding video viral | शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर

शुभमंगल सावधान! प्रसाद जवादे-अमृता देशमुख अडकले लग्नाच्या बेडीत, सप्तपदीचा व्हिडिओ समोर

मराठी कलाविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. गेल्या कित्येक दिवसापासून चाहते ज्याची आतुरतेने वाट पाहत होते ती टीव्ही विश्वातील लोकप्रिय जोडी विवाहबंधनात अजकली आहे. अमृता देशमुख आणि प्रसाद जवादेने लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. आता त्यांच्या शाही विवाहसोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडिओ समोर आला आहे. 

प्रसाद आणि अमृताने लग्नासाठी खास पांरपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाच्या साडीत अमृताचं सौंदर्य खुलून आलं होतं. तर धोतर, सदरा आणि टोपी असा मराठमोळा लूक प्रसादने केला होता. या लूकमध्ये प्रसाद राजबिंडा दिसत होता. प्रसाद आणि अमृताने मित्रपरिवार, कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नातील सप्तपदीचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये प्रसादने केलेल्या कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी प्रसाद आणि अमृताला शुभेच्छा दिल्या आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या घरात प्रसाद आणि अमृताची पहिली भेट झाली होती. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात ते दोघेही सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. घरातून बाहेर पडताच त्यांनी प्रेमाची कबुली देत गुपचूप साखरपुडाही उरकला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 

प्रसाद आणि अमृता दोघेही उत्तम कलाकार आहेत. त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.  त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, पृथ्विक प्रताप हे कलाकार उपस्थित होते. तर प्रार्थना बेहेरेनेही पतीबरोबर त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. 

Web Title: marathi actress amruta deshmukh tie knot with actor prasad jawade wedding video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.