"बुढापे मे डान्स करना मुश्किल" युझरच्या खोचक कमेंटवर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 18:53 IST2023-11-23T18:48:57+5:302023-11-23T18:53:30+5:30

ऐश्वर्या नारकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्या नृत्याचा सराव करत आहेत.

marathi actress Aishwarya Narkar gave a befitting reply to the user s comment on her dance video | "बुढापे मे डान्स करना मुश्किल" युझरच्या खोचक कमेंटवर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर

"बुढापे मे डान्स करना मुश्किल" युझरच्या खोचक कमेंटवर ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर

मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) सध्या 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहेत. मालिकेतील सहकलाकारांसोबतचे त्यांचे अनेक रील्सही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर अनेकदा त्यांना आणि पती अविनाश  नारकर यांना रील्समुळे ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे. नुकतंच एका सोहळ्यासाठी ऐश्वर्या नारकर डान्सचा सराव करत होत्या. त्यांच्या डान्स रीलवर एका युझरने खोचक प्रतिक्रिया दिली. 

ऐश्वर्या नारकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्या नृत्याचा सराव करत आहेत. वाहिनीवरील एका कार्यक्रमासाठी त्यांचा हा सराव सुरु असल्याचं दिसतंय. 'डान्स इज अ रिअल स्ट्रगल' असं कॅप्शनही त्यांनी व्हिडिओला दिलंय. वयाच्या पन्नाशीतही त्या अगदी फिट आहेत आणि उत्तम डान्सही करत आहेत.

मात्र त्यांच्या या व्हिडिओवरही काही युझरने निशाणा साधलाय. 'बुढापे मे डान्स करना मुश्किल है,आमच्यात म्हातारे लोक डान्स करत नाहीत तर आम्ही त्यांची सेवा करतो जेणेकरुन ते जास्त जगतील.' युझरच्या या कमेंटला ऐश्वर्या नारकर यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. 'म्हाताऱ्यांना व्यायाम करायला सांगा म्हणजे ते फीट राहतील. जेणेकरुन त्यांची सेवा करायची गरज पडणार नाही.'

ऐश्वर्या नारकर आणि ट्रोलर्सचा नेहमीच आमनासामना होत असतो. आता या कमेंटवरुन त्यांनी ट्रोलरची बोलती बंद केली आहे. 

Web Title: marathi actress Aishwarya Narkar gave a befitting reply to the user s comment on her dance video