'मुरांबा' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट! या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:55 IST2025-05-09T11:54:24+5:302025-05-09T11:55:50+5:30

शंशाक केतकरच्या मुरांबा मालिकेत मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

marathi actress aditi sarangdhar entry in the marathi serial Muramba shashank ketkar | 'मुरांबा' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट! या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती?

'मुरांबा' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट! या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती?

स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही मालिका गेली अनेक वर्ष टीआरपीमध्ये चर्चेत आहे. शशांक केतकर, शिवानी मुंधेकर, निशाणी बोरुले या कलाकारांच्या मालिकेत प्रमुख भूमिका आहेत. अशातच 'मुरांबा' मालिकेत एका नवीन अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. या अभिनेत्रीच्या भूमिकेचाही उलगडा झाला. कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या. 

या अभिनेत्रीची 'मुरांबा'मध्ये होणार एन्ट्री

स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. इरावती मुकादम असं या व्यक्तिरेखेचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर इरावती हे पात्र साकारणार आहे. इरावती परदेशात अनेक वर्षे राहून आता मुकादम कुटुंबात पाऊल ठेवतेय. डावपेच करण्यात हुशार असणाऱ्या इरावतीला रमाची जागा रमासारख्या हुबेहुब दिसणाऱ्या माहीने घ्यायला हवी असं वाटतंय आणि त्याच मनसुब्याने ती मुकादमांच्या घरी आलीय. इरावतीचा प्लॅन यशस्वी होणार का? तिच्या आगमनाने मुकादम कुटुंबात काय वादळ उठणार हे पहाणं उत्सुकतेचं असेल.


आदिती काय म्हणाली?

या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना अदिती सारंगधर म्हणाली, ‘मुरांबा मालिकेने नुकतेच एक हजार भाग पूर्ण केले. हजारचा टप्पा गाठल्यानंतर अतिशय उत्कंठावर्धक वळणावर मला एका चांगल्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अश्या पद्धतीची भूमिका मी याआधी केलेली नाही. मी पहिल्यांदा मेडिटेशन हीलरच्या रुपात दिसणार आहे. एका छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येताना खूप आनंद होतोय. मालिकेत अश्या वळणावर इरावती पात्राची एण्ट्री होतेय जिथे खरं काय आणि खोटं काय याची पारख करण्यात संपूर्ण मुकादम कुटुंब गुंतलं आहे. इरावतीच्या एण्ट्रीने ही गुंतागुंत वाढणार की कमी होणार यासाठी नक्की प्रेक्षकांना मुरांबा मालिका बघावी लागेल.

Web Title: marathi actress aditi sarangdhar entry in the marathi serial Muramba shashank ketkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.