विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, प्रशस्त हॉल अन्...; विवेक सांगळेच्या घराची झलक, खिडकीतून दिसतं अख्खं लालबाग-परळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:23 IST2025-10-06T15:22:35+5:302025-10-06T15:23:12+5:30
विवेकने नुकतंच घेतलेलं घर अगदी सुंदर पद्धतीने सजवलं आहे. इन्स्टाग्रामवरुन त्याने व्हिडीओ शेअर करत यात घराची झलक दाखवली आहे.

विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, प्रशस्त हॉल अन्...; विवेक सांगळेच्या घराची झलक, खिडकीतून दिसतं अख्खं लालबाग-परळ
काही दिवसांपूर्वीच 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम मराठी अभिनेता विवेक सांगळेने मुंबईत घर घेतलं. मुंबईतील लालबाग या प्राइम लोकेशनवर घर घेत विवेकने स्वत:चं स्वप्न पूर्ण केलं. सोशल मीडियावरुन ही खूशखबर त्याने चाहत्यांसोबत शेअर केली होती. गृहप्रवेशाचा व्हिडीओ त्याने शेअर केला होता. आता विवेकने त्याच्या घराची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
विवेकने नुकतंच घेतलेलं घर अगदी सुंदर पद्धतीने सजवलं आहे. इन्स्टाग्रामवरुन त्याने व्हिडीओ शेअर करत यात घराची झलक दाखवली आहे. घराची नेमप्लेट अतिशय सुंदर आहे. दोन मुखवटे त्याच्या नेमप्लेटवर आहेत. विवेकच्या घराला प्रशस्त हॉल आहे. हॉलच्या खिडकीतून अख्खं लालबाग-परळ दिसतं. हॉलमध्ये एका बाजूला सोफा तर दुसऱ्या भींतीवर टीव्ही लावलेला आहे. दरवाजातून घरात प्रवेश केल्यानंतर हॉलच्या सुरुवातीलाच विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मूर्ती आहे. किचन आणि बेडरुममध्ये छान पद्धतीने फर्निचर केलेलं आहे. तर बेडरुमच्या एका भींतवर काही सिनेमांच्या फ्रेम्स लावल्या आहेत.
दरम्यान, विवेक सांगळेने २००९-१० साली अभिनय क्षेत्रात आला. त्याने 'आई माझी काळूबाई','लव्ह लग्न लोचा','भाग्य दिले तू मला' या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'भाग्य दिले तू मला'मध्ये त्याची आणि तन्वी मुंडलेची जोडी गाजली. तर आता तो 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.