'स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये'; विकास पाटीलने घेतला मालिकेचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 17:49 IST2023-07-17T17:48:56+5:302023-07-17T17:49:21+5:30

Vikas patil: या पोस्टसह त्याने मालिकेतील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. तसंच लवकरच तो नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचे संकेतही दिले आहेत.

MARATHI ACTOR vikas patil last day of tv serial jay jay swami samarth | 'स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये'; विकास पाटीलने घेतला मालिकेचा निरोप

'स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये'; विकास पाटीलने घेतला मालिकेचा निरोप

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे विकास पाटील (vikas patil). बिग बॉस मराठीच्या घरात झळकलेला विकास गेल्या काही दिवसांपासून जय जय स्वामी समर्थ या मालिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेत स्वामीसूत ही भूमिका साकारुन त्याने विशेष लोकप्रियता मिळवली. मात्र, नुकताच त्याने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.

जय जय स्वामी समर्थ या मालिकेत विकास स्वामीसूत ही महत्त्वाची भूमिका साकारत होता. मात्र, या मालिकेतील त्याच्या पात्राची भूमिका संपल्यामुळे त्याने या मालिकेचा निरोप घेतला आहे. त्यापूर्वी या मालिकेविषयी आणि स्वामी समर्थांविषयी त्याने एक पोस्ट लिहिली आहे.

स्वामीसुत पर्वाचा शेवटचा भाग आज प्रदर्शित होतोय... खूप काही मिळालं या प्रवासात !! स्वामींचे कसे आभार मानावेत तेच कळत नाहीये .. इतक्या कमी कालावधीत एक अखंड आयुष्य जगल्याचा अनुभव मिळाला, प्रत्येक पात्र तुम्हाला काही ना काही देऊन जात असतं..पण या पत्राने जगणं शिकवलं, गुरुंप्रती नितांत श्रद्धा ठेवणं शिकवलं, कठीण काळात जराही न डगमगता आपल्या गुरूंवर अढळ विश्वास ठेवून लढणं आणि पुढे जात राहणं शिकवलं, संसारात राहूनही वैराग्य कसं सांभाळावं हे शिकवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”ही आयुष्यभर पुरणारी शाश्वती मिळाली !! माझ्या पूर्वपुण्याईनेच "स्वामीसुत" साकारायची संधी मिळाली.तुम्हा सर्व मायबाप प्रेक्षकांचे आभार ज्यांनी या पात्रावर भरभरून प्रेम केलं पुन्हा भेटू लवकरच एका नव्या पात्रासोबत श्री स्वामी समर्थ, असं कॅप्शन देत विकासने ही पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान, या पोस्टसह त्याने मालिकेतील काही फोटोदेखील शेअर केले आहेत. तसंच लवकरच तो नव्या प्रोजेक्टमध्ये झळकणार असल्याचे संकेतही त्याने दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विकासला रुपेरी पडद्यावर पाहण्याचे प्रेक्षकांना वेध लागले आहेत.
 

Web Title: MARATHI ACTOR vikas patil last day of tv serial jay jay swami samarth