"जे घडलं त्याचा विचारही केला नव्हता, पण...", मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले-"भूतकाळातल्या चुका सुधारून…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:19 IST2025-12-30T15:05:18+5:302025-12-30T15:19:53+5:30
"जे घडलं त्याचा विचारही केला नव्हता,पण...",सरत्या वर्षाला निरोप देताना मिलिंद गवळींनी शेअर केल्या भावुक आठवणी

"जे घडलं त्याचा विचारही केला नव्हता, पण...", मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले-"भूतकाळातल्या चुका सुधारून…"
Milind Gawali Post: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे मिलिंद गवळी. स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतून त्यांनी जवळपास ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर आता ते वचन दिले तू मला या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेत ते एका वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान, मिलिंद गवळी त्यांच्या कामामुळे चर्चेत असतात. याशिवाय त्यांच्या सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओंची सुद्धा तितकीच चर्चा होते. नुकतीच मिलिंद गवळींनी इन्स्टाग्रामवर सरत्या वर्षांचा अनुभव शेअर करणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
दरम्यान, आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर मिलिंद गवळींनी सरत्या वर्षाला निरोप देत असताना काही भावुक आठवणी शेअर केल्या आहेत. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, "२०२५ संपणार. एक वर्ष कसं निघून जातं कळतच नाही.या ३६५ दिवसांमध्ये आपल्या आयुष्यात जे जे घडलं त्याचा आपण कदाचित कधी विचारही केला नव्हता. अनेक गोष्टी अशा घडल्या ज्या आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या होत्या. नवीन वर्ष आलं की आपण manifest करतो की पुढच्या वर्षी आपल्याला काय काय करायचं आहे आणि वर्षाच्या शेवटी लक्षात येतं की जे ठरवलं ते केलंच नाही भलतच काहीतरी केलं.
पुढे त्यांनी म्हटलंय, "मी Professional level वर २०२५ ला मालिका "आई कुठे काय करते" ५ वर्षाच्या यशस्वी run नंतर संपली होती. काही महिने लागले त्या अनिरुद्ध देशमुख चं detoxification करायला. मग "लग्नानंतर होईल प्रेम" ही स्टारप्रवाह वरची शशांक सोळंकीच्या मालिकेत GuestAppearance कराण्याची संधी मिळाली, लगेच केदार शिंदे चा सिनेमा "झापूक झूपूक" केला, मग लगेचच राजश्री प्रॉडक्शन ची 'Colors'साठी हिंदी मालिका "मनपसंद की शादी" मध्ये राजाराम शिंदे ची सुंदर भूमिका मिळाली. आणि ती संपत नाही तर पुन्हा स्टार प्रवाह वाहिनीवर "वचन दिले तू मला"परत शशांक सोळंकी यांच्या मालिकेमध्ये एडवोकेट हर्षवर्धन जागीरदार ची दमदार भूमिका मिळाली. पंजाबराव भोसले, राजाराम शिंदे यांचा २०२५ मध्ये माझ्याबरोबर चा प्रवास थांबला पण २०२६ मध्ये मी हर्षवर्धनला माझ्याबरोबर घेऊन चालणार आहे."
या पोस्टमध्ये मिलिंद गवळींनी २०२५ मध्ये त्यांच्या आयुष्यात घडलेले काही भावुक प्रसंगही शेअर केलेत. त्याविषयी त्यांनी लिहिलंय,"२०२५ मध्ये अनेक कार्यक्रम मी attend केले, ज्यांनी ज्यांनी प्रेमाने आमंत्रण दिलं त्यांच्या कार्यक्रमाला शूटिंग नसेल तर आवर्जून हजेरी लावली. अनेक नवीन लोकांशी ओळख झाली. पहिल्यांदा चार्टर्ड विमानात बसलो, एक्वा लाईन मेट्रो जमिनी खालून जाणारी त्यात बसलो, समुद्रातून जाणाऱ्या सिलिंग मधून गाडी चालवली, अटल सेतू, समृद्धी हायवे वर पण गाडी चालवली. माझ्या फॅमिली बरोबर पण छान क्षण experience केले. २०२५ मध्ये दुखद गोष्टी पण खूप घडल्या, माझ्या व्यवसायातले दोन परीचीत कलाकार प्रिया मराठे आणि डॉ विलास ऊजवणे हे जग सोडून गेले, Personal level माझे लहान मामा दिपक निमसे, माझी शैला मावशी हे दोघं अतिशय प्रेमळ, अतिशय जीव लावणारे आम्हाला सोडून निघून गेले. लहानपणी ज्यांच्याकडून Chess खेळायला शिकलो ते आमचे भीमराव पाटील काका तेही निघून गेले.
भूतकाळातल्या चुका सुधारून...
"Life is Unpredictable .आपण जीवनाचा विचार केला तर "जगाच्या पाठीवर" सिनेमातलं ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी गायलेलं गाणं आठवतं "एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र मानवा तुझीया आयुष्याचे".वर्ष येणार आणि जाणार आजचा दिवसच आपला आहे, भूतकाळातल्या चुकां सुधारून भविष्याचे स्वप्न पुन्हा पाहून, आजचा दिवस छान जगण्याचं वचन स्वतःला देऊ.नवीन वर्षाच्या....", अशी भलीमोठी पोस्ट लिहून अभिनेत्याने त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.