कॉलेजमध्ये पाहिलं अन् पहिल्याच नजरेत जडला जीव! 'ठरलं तर मग' मधील नागराजची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी, म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 14:34 IST2026-04-08T14:31:31+5:302026-04-08T14:34:41+5:30

पडद्यावर कठोर पण खऱ्या आयुष्यात अभिनेता आहे भलताच रोमँटिक !'ठरलं तर मग' मधील नागराजची हटके प्रेमकहाणी, म्हणाला...

marathi actor tharla tar mag serial fame dnyanesh wadekar frist time talk about her lovestory | कॉलेजमध्ये पाहिलं अन् पहिल्याच नजरेत जडला जीव! 'ठरलं तर मग' मधील नागराजची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी, म्हणाला... 

कॉलेजमध्ये पाहिलं अन् पहिल्याच नजरेत जडला जीव! 'ठरलं तर मग' मधील नागराजची लव्हस्टोरी आहे खूपच फिल्मी, म्हणाला... 

Tharla Tar Mag Actor: छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे.या मालिकेचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे. या मालिकेप्रमाणे त्यातील प्रत्येक पात्र देखील आता घराघरात पोहोचलं आहे. दरम्यान,‘ठरलं तर मग’ मालिकेत खलनायक नागराजची भूमिका साकारणारे ज्ञानेश वाडेकर सध्या चर्चेत आहेत. मालिकेत कठोर स्वभाव दाखवणारा नागराज खऱ्या आयुष्यात मात्र खूप रोमँटिक आहे.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं आहे. 

अभिनेता ज्ञानेश वाडेकरच्या लव्हस्टोरीची सुरुवात अगदी साध्या आणि फिल्मी स्टाइलने झाली.नुकत्याच  'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याची लव्हस्टोरी सांगितली. आर्किटेक्चरचं शिक्षण घेत असताना ज्ञानेशची पत्नी जानकीसोबत कॉलेजमध्ये ओळख झाली. सुरुवातीला केवळ मैत्री होती, पण एका छोट्या प्रसंगाने सगळं बदललं. या मुलाखतीत अभिनेता म्हणाला,"एक वय असतं. बघून प्रेमात पडतात तसं काहीच नव्हतं. आपल्या आयुष्यात मैत्रीणच नाही, या अंडर प्रेशरमध्ये मी होतो. तर मैत्रीण पाहिजे असं म्हणून मी हिला बघ, तिला बघ, मग ही नाही ती नाही...काही प्रतिसाद यायचा नाही."

त्यानंतर पुढे अभिनेत्याने पत्नीबद्दल बोलताना सांगितलं,"मग ही नेमकी भेटली, कॉलेजमध्ये सबमिशन्स असतात तिथे आलेली. सबमिशन घेऊन गेली. तिचा रुमाल पडलेला. मित्राने मला तिचा रुमाल पडलेला दाखवला. तिला मी तो रुमाल नेऊन दिला. तेव्हाही काय डोक्यात नव्हतं. नंतर जेव्हा ती परत बोलायला आली, तेव्हा फसली. त्यानंतर मी ठरवलं, ही आपल्यासाठी योग्य आहे.उत्तम आहे, चांगली आहे."

दरम्यान, एका पत्रामुळे ज्ञानेश आणि त्याच्या पत्नीची मैत्री अधिक घट्ट झाली आणि हळूहळू त्यातून प्रेमाची सुरुवात झाली.काही वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी २००५ मध्ये लग्न केलं. साध्या रुमालापासून सुरू झालेली ही कथा आज एक सुंदर नात्यात बदलली आहे.

Web Title : 'ठरलं तर मग' के नागराज ने साझा की अपनी फिल्मी प्रेम कहानी।

Web Summary : 'ठरलं तर मग' में नागराज के रूप में जाने जाने वाले ज्ञानेश वाडेकर ने अपनी रोमांटिक प्रेम कहानी बताई। यह कॉलेज में एक रूमाल लौटाने के साधारण कार्य से शुरू हुई, जिसके बाद कुछ वर्षों बाद शादी हो गई।

Web Title : Nagraj from 'Tharla Tar Mag' shares his filmy college love story.

Web Summary : Dnyanesh Wadekar, known as Nagraj in 'Tharla Tar Mag,' revealed his romantic love story. It began in college with a simple act of returning a handkerchief, leading to marriage after a few years.