'माझी तुझी रेशीमगाठ'फेम 'हा' अभिनेता नव्या भूमिकेत; कुकरी शोमध्ये करतोय सूत्रसंचालन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 14:30 IST2021-11-23T14:30:00+5:302021-11-23T14:30:00+5:30
Kitchen Kallakar: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आता प्रेक्षकांना एका नव्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ'फेम 'हा' अभिनेता नव्या भूमिकेत; कुकरी शोमध्ये करतोय सूत्रसंचालन
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ' (majhi tujhi reshimgaath). या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या कलाकारांच्या प्रोफेशनल, पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यामध्येच आता मालिकेतील एका लोकप्रिय कलाकाराविषयी नवी माहिती समोर आली आहे. या मालिकेतील एक अभिनेता आता नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील समीर म्हणजेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (sankarshan karhade) आता प्रेक्षकांना एका नव्या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.उत्तम अभिनेता, कवी, लेखक अशा विविधांगी भूमिका पार पाडणारा संकर्षण येत्या काळात एका कुकरी शोचं सूत्रसंचालन करतांना दिसणार आहे. झी मराठीवर लवकरच 'किचन कल्लाकार' हा नवीन कुकरी शो सुरु होत आहे. या कार्यक्रमात संकर्षण दिसणार आहे.
नुकताच 'किचन' कल्लाकार (Kitchen Kallakar )या नव्या शोचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये संकर्षण दिसून येत आहे. आता भल्या भल्या कलाकारांची शिट्टी वाजणार आणि मनोरंजनाची चव वाढणार, असं संकर्षण या टीझरमध्ये म्हणत आहे.
दरम्यान, प्रदर्शित झालेल्या या टीझरवरुन आणि त्याच्या नावावरुन पडद्यावरील कलाकारांची खवैय्येगिरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.