संग्रामचं 'ते' एक वाक्य अन् खुशबूचा लगेच होकार, मराठी जोडप्याची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 12:27 IST2023-05-22T12:26:42+5:302023-05-22T12:27:30+5:30

'तुमच्यासाठी काय पन' हा संग्रामचा डायलॉग चांगलाच गाजला होता. तर खऱ्या आयुष्यातही एका डायलॉंगने त्याने खुशबूला प्रपोज केलं होतं आणि तिनेही थेट होकार दिला होता.

marathi actor sangram salvi and actress khushboo tawde interesting love story | संग्रामचं 'ते' एक वाक्य अन् खुशबूचा लगेच होकार, मराठी जोडप्याची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

संग्रामचं 'ते' एक वाक्य अन् खुशबूचा लगेच होकार, मराठी जोडप्याची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता संग्राम साळवी (Sangram Salvi) आणि अभिनेत्री खुशबू तावडे (Khushboo Tawde) यांची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. 'तुमच्यासाठी काय पन' हा संग्रामचा मालिकेतील डायलॉग चांगलाच गाजला होता. तर खऱ्या आयुष्यातही एका डायलॉंगने त्याने खुशबूला प्रपोज केलं होतं आणि तिनेही थेट होकार दिला होता. नेमकी काय आहे त्यांची लव्हस्टोरी बघुया.

'देवयानी' या लोकप्रिय मालिकेत संग्राम साळवी मुख्य भूमिका साकारत होता. याच मालिकेत नंतर खुशबू तावडेला एक भूमिका मिळाली होती. तेव्हा तिला सेटवर पाहताच तो तिच्या प्रेमात पडला होता. पण आपल्या मनातलं तिला सांगायची त्याची हिंमत होईना. तर दुसरीकडे खुशबूला नेहमी असंच वाटायचं की संग्रामला खूप अॅटिट्यूड आहे. म्हणूनच ती त्याच्याशी स्वत:हून बोलायची नाही. दरम्यान मालिकेच्या स्क्रीप्टप्रमाणे खुशबूची भूमिका संपली आणि ती मालिकेतून बाहेर पडली. नंतर संग्रामने मेकअप आर्टिस्टकडून खुशबूचा नंबर मिळवला.

काही दिवसांनी संग्रामने खुशबूला फोन करुन एका कॅफेत भेटायला येण्यास सांगितले. तोपर्यंत खुशबूलाही काहीशी शंका आलीच होती कारण सेटवर मेकअप आर्टिस्ट तिला 'भाभी' म्हणाला होता. संग्रामला कॅफेमध्ये भेटताच त्याने तिला थेट प्रपोजच केले तेही खास अंदाजात. 'माझ्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल का' असं त्याने तिला विचारलं आणि तिनेही लगेच होकार दिला. 

५ मार्च २०१८ रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. तर लग्नानंतर ३ वर्षांनी २ नोव्हेंबर २०२१ साली त्यांना मुलगा झाला. त्याचं नाव 'राघव' असं ठेवण्यात आलं. सध्या खुशबू तावडेची 'आई कुठे काय करते' मालिकेत एंट्री झाली आहे. तर संग्राम वेबसिरीजमध्ये व्यस्त आहे.

Web Title: marathi actor sangram salvi and actress khushboo tawde interesting love story