'या' एका कारणामुळे मिलिंद गवळींना मानले अभिषेकचे आभार; ऑनस्क्रीन लेकासाठी लिहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 04:18 PM2024-02-13T16:18:57+5:302024-02-13T16:19:18+5:30

Milind gawali: मिलिंद गवळी कायम त्यांच्या सहकलाकारांविषयी पोस्ट शेअर करत असतात.

marathi actor Milind Gawli share special post for abhishek deshmukh | 'या' एका कारणामुळे मिलिंद गवळींना मानले अभिषेकचे आभार; ऑनस्क्रीन लेकासाठी लिहिली पोस्ट

'या' एका कारणामुळे मिलिंद गवळींना मानले अभिषेकचे आभार; ऑनस्क्रीन लेकासाठी लिहिली पोस्ट

छोट्या पडद्यावर 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने बरीच लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या बऱ्याच काळापासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांना आपलासा वाटतो. विशेष म्हणजे प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या या कलाकारांचीही एकमेकांसोबत छान गट्टी जमली आहे. त्यामुळे ही कलाकार मंडळी कायम एकमेकांविषयीचे किस्से वा त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. यामध्येच मिलिंद गवळी यांनी अभिनेता अभिषेक देशमुखविषयी पोस्ट शेअर केली आहे.

"between the lines एकदा का स्क्रिप्ट हातात आली की, मग त्यामध्ये काय लिहिलं आहे त्याच्यापेक्षा, दोन वाक्यांमध्ये जे न लिहिलेल्या शब्दांचा अर्थ काय सापडतोय का ते शोधायचा मी नेहमी प्रयत्न करतो. खरंच कधी कधी न लिहिलेल्या शब्दांमध्येच बराच अर्थ दडलेला असतो, आपण एखाद्या व्यक्तीला खूप चांगले ओळखत असू तर त्याच्या न बोललेल्या शब्दांचेही अर्थ आपल्याला समजायला लागतात, तसंच “pause” म्हणजे मराठीमध्ये “विराम” याला पण खूप अर्थ असतो, विक्रम गोखले हे उत्कृष्ट अभिनेते होते, वाक्यांमध्ये कुठे आणि कसा pause घ्यायचा आणि तो किती घ्यायचा यामध्ये त्यांचा हात आजतागायत कुठलाही अभिनेता धरू शकला नाही, मोठमोठे हिंदीतले अभिनेते सुद्धा त्यांच्याकडून ते pause घेणे शिकले.पण एखाद्या साधारण कलाकारांनी जर वाक्यात पॉज घेतला तर तो वाक्य विसरला असंच समजलं जातं. हे झालं कलाकारांचं पण साधारण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा या पॉजला खूप महत्त्व आहे. म्हणजे पोलीस जेव्हा आरोपीची चौकशी करतात तेव्हा तो प्रश्नांची उत्तर देताना कुठे कुठे पोज घेतोय याच्यावरून तू खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे त्यांना लगेच समजतं", असं मिलिंद गवळी लिहितात.

पुढे ते म्हणतात, "मी लहान असताना घरी माझा एखादा मित्र आला आणि मी त्याला जर समजा असा प्रश्न विचारला “काय रे जेवून आलास का तू ? “ तर त्याच्या पॉजमध्ये माझ्या आईला कळायचं की हा मुलगा उपाशी आहे आणि ती लगेच त्याला आग्रह करून जेवायला वाढायची.माझी आई कधीच कोणालाही तू जेवून आलास का ? की तू चहा घेणार आहेस का? असं कधीच विचारायची नाही.तिच्या वाक्यामध्ये असायचे “चहा ठेवलाय, किंवा जेवायला वाढते आहे ! तुम्ही जेवायला बसा ! या वाक्यामध्ये आणि तिच्या त्या जेवण वाढायच्या कृतीमध्ये ती कधीही पॉज घ्यायची नाही. त्यामुळे समोरच्या माणसाला हो किंवा नाही, हा विचार करायलाच वेळच मिळायचा नाही, त्याला थेट जेवायलाच बसायला लागायचं. काल “आई कुठे काय करते” च्या सेटवर सीनच्या मधल्या वेळेत मी अंगणात शांत बसलो होतो आणि तिथे आमचा यश म्हणजे अभिषेक देशमुख आला आणि त्याने pause न घेता माझे photos आणि videos काढले.तू स्वतः हून निसंकोचपणे हे असं गोड गोड वागतो. thankyou".
 

Web Title: marathi actor Milind Gawli share special post for abhishek deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.