बाईsss! कुशल बद्रिकेने बिकिनीमधील मुलींसोबत केले फोटो शेअर, म्हणाला- "काहीतरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 10:00 IST2024-08-30T09:59:04+5:302024-08-30T10:00:37+5:30

कुशल बद्रिकेचं काय चाललंय? बिकिनीमधील मुलींसोबत फोटो शेअर करत म्हणाला...

marathi actor kushal badrike shared photo with bikini girls goes viral | बाईsss! कुशल बद्रिकेने बिकिनीमधील मुलींसोबत केले फोटो शेअर, म्हणाला- "काहीतरी..."

बाईsss! कुशल बद्रिकेने बिकिनीमधील मुलींसोबत केले फोटो शेअर, म्हणाला- "काहीतरी..."

कुशल बद्रिके हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. उत्तम अभिनय आणि विनोदीशैलीच्या जोरावर कुशलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या कुशलने अपार मेहनत आणि कष्टाच्या जोरावर स्वत:ची ओळख बनवली. कुशल सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्यातील माहिती तो चाहत्यांना पोस्टद्वारे देत असतो. 

कुशलने नुकतंच त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये कुशलबरोबर दोन बिकिनी घातलेल्या मुलीही दिसत आहेत. कुशलचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच्या या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कुशलने हा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या फोटोला त्याने "काहीतरी नवीन करतोय शुभेच्छा असू द्या", असं कॅप्शन दिलं आहे. हे फोटो शूटिंगचे असल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये लाईट्स आणि कॅमेरेही दिसत आहेत. 


कुशलने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'चला हवा येऊ द्या' या शोने कुशलला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी कॉमेडी शोमध्येही तो दिसला होता. या शोमधून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 'जत्रा', 'पांडू', 'डावपेच', 'भिरकीट', 'रंपाट', 'बापमाणूस', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'माझा नवरा तुझी बायको' यांसारख्या सिनेमात त्याने काम केलं आहे. 

Web Title: marathi actor kushal badrike shared photo with bikini girls goes viral