बायकोला लाल गुलाब द्या अन् प्रेयसीला....; कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमाचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 14:28 IST2023-03-08T14:27:45+5:302023-03-08T14:28:40+5:30

Kushal badrike: अलिकडेच त्याने रंगांचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा कसा जवळचा संबंध आहे हे एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

marathi actor kushal badrike post from holi festivel | बायकोला लाल गुलाब द्या अन् प्रेयसीला....; कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमाचा फंडा

बायकोला लाल गुलाब द्या अन् प्रेयसीला....; कुशल बद्रिकेने सांगितला प्रेमाचा फंडा

आपल्या उत्तम अभिनयशैली आणि विनोदबुद्धीच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं करणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). 'चला हवा येऊ द्या'च्या (chala hawa yeu dya) माध्यमातून घराघरात पोहोचलेला कुशल सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर तो नवनवीन पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असतो. अलिकडेच त्याने रंगांचा आणि प्रेम व्यक्त करण्याचा कसा जवळचा संबंध आहे हे एका पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आपल्याला एखाद्या व्यक्ती विषयी नेमकं काय वाटतं, हे सांगताना शब्द कमी पडले की मदतीला “रंग” धावून येतात. म्हणून तर प्रेयसीला आपण “गुलाबी” गुलाब देतो आणि बायकोला “लाल”. रक्ताचं नातं उगाच का म्हणतात तिला!! आता काही माणसं बायकोला गुलाब, देत सुद्धा नाहीत, लग्नानंतर ज्यांच्या आयुष्यातला “रंगच” उडालाय त्यांच्याविषयी आपण काय बोलणार.पण या रंगीबेरंगी दुनियेत “अंतरंग” ओळखणारी माणसं सोबतीला असली ना, की आयुष्य रंगीत होऊन जातं आणि जगण्याचा उत्सव होतो. आपल्या रंगोत्सवाचे रूपांतर जीवनोत्सवात होऊन जाऊ देत,  अशी पोस्ट कुशलने शेअर केली आहे.

दरम्यान, कुशलची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोबतच त्याने त्याचा एक फोटोही शेअर केला आहे. कुशल मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता असून त्याने रिअॅलिटी शो सोबतच काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 
 

Web Title: marathi actor kushal badrike post from holi festivel