‘मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय...’, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी लिहिली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 16:03 IST2022-03-03T16:00:33+5:302022-03-03T16:03:25+5:30

Kiran Mane Post : होय, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी पोस्ट लिहिली आहे आणि त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.  

marathi actor kiran mane post on shahrukh khan son aryan khan drugs case | ‘मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय...’, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी लिहिली पोस्ट

‘मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय...’, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी लिहिली पोस्ट

अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून तडकाफडकी काढलं गेलं आणि अनेक आरोप प्रत्यारोप रंगले. राजकीय भूमिका घेतल्यामुळं आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण मानेंनी केला. पण वाहिनीने, हा आरोप खोडून काढत त्यांची वागणूक ठीक नसल्यामुळे त्यांना मालिकेतून काढल्याचं स्पष्ट केलं. तेव्हापासून किरण माने सतत चर्चेत आहे. तूर्तास मात्र त्यांची एका वेगळ्याच कारणानं चर्चा  होतेय.  कारण आहे किंगखान शाहरूख खान.
होय, किरण मानेंनी थेट शाहरूखसाठी (Shahrukh Khan) पोस्ट लिहिली आहे आणि त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.  

किरण माने पोस्टमध्ये लिहितात...

आपल्या शारख्याचा 'पठान' पिच्चर लागंल तवा लागंल.. आज मात्र त्यानं व्यवस्थित पठान लावला. संविधानिक मार्गानं !

एन.सी.बी नं सखोल चौकशी करून आर्यन खानला निर्दोष जाहीर केलेलं हाय. आर्यनकडं कुठलाच अंमली पदार्थ सापडला नाय आनि त्याचा कुठल्याबी आंतरराष्ट्रीय ड्रग गँगशी संबंध असल्याचा पुरावाबी सापडला नाय.

...कटकारस्थान्यांनी गळ्यात पट्टा बांधून पाळलेले सरकारी अधिकारी किती भिकारचोटपना करत्यात आनि त्यांची विषारी पिलावळ अशा भुरट्या अधिकार्‍यांना 'सिंघम' , 'सिंघम' करत कसं डोक्यावर नाचवत्यात याचं ढळढळीत उदाहरन हाय हे ! 'बदनामी' हे या पाताळयंत्री बांडगुळांचं मुख्य जाळं हाय भावांनो... समजून घ्या. हज्जारो वर्षांपास्नं विरोधकांना या जाळ्यातच अडकवत आलेत हे. 'आमचा विरोध कराल तर बदनाम करू.' असा संदेश द्यायचा असतो यांना. त्या बदनामीच्या भितीच्या चिंध्या करून निडरपने पुढं जानारा वाघ एखादाच असतो.. मग त्यो त्यांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय !

शाहरूख, लब्यू भावा..... , असं किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Web Title: marathi actor kiran mane post on shahrukh khan son aryan khan drugs case