ऑनस्क्रीन बाप-लेकीचा ‘चलेया’ गाण्यावर झक्कास डान्स, किरण माने म्हणाले...'नाचता येत नसतानाबी नाचायला लागलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 03:13 PM2023-09-15T15:13:50+5:302023-09-15T15:15:42+5:30

अभिनेता किरण माने आणि बालकलाकार अनन्या टेकवडे या दोघांनी 'चलेया' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

Marathi Actor Kiran Mane Dance with ananya tekawade On Shahrukh Khan Song Chaleya From Jawan | ऑनस्क्रीन बाप-लेकीचा ‘चलेया’ गाण्यावर झक्कास डान्स, किरण माने म्हणाले...'नाचता येत नसतानाबी नाचायला लागलं'

kiran mane

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा ‘जवान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात शाहरुखचा हटके अंदाज आणि सिनेमातील लूक पाहून चाहते भारावून गेले आहेत. चित्रपटातील गाण्यांना चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं आहे. जवान चित्रपटातील 'चलेया' हे गाणं फार चर्चेत आहे. अनेकांनी या गाण्यावर रील व्हिडीओ देखील बनवले आहेत. 

सध्या हे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होतायत. अशात अभिनेता किरण माने आणि ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतील चिंधी म्हणजे बालकलाकार अनन्या टेकवडे या दोघांनी या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या भन्नाट डान्स स्टेप्स पाहून नेटकरी फार खूश झालेत.


किरण माने यांनी इन्स्टाग्रावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते आपली ऑनस्क्रीन मुलगी म्हणजेच  ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतील चिंधी अर्थात बालकलाकार अनन्या टेकवडेसोबत डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडीओला किरण मानेंनी कॅप्शन दिलं की, "लाडक्या लेकीचा हट्ट पुरवावा लागला. मला नाचता येत नसतानाबी नाचायला लागलं". ऑनस्क्रीन बाप लेकीचा हा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. 

 अभिनेते  किरण माने हे बिग बॉस मराठी शोमधून प्रकाशझोतात आले होते. उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळे किरण माने कायम चर्चेत असतात. ते कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. पोस्टद्वारे सामाजिक विषयांवर किंवा कलाक्षेत्रात घडणाऱ्या अनेक विषयांवर परखडपणे आपलं मत मांडत असतात. किरण माने किंग खानचे चाहते आहेत. जवान चित्रपट पदर्शित झाल्यापासून त्यांनी शाहरुख आणि चित्रपटासंबंधित अनेक पोस्ट केल्या आहेत.  
 

Web Title: Marathi Actor Kiran Mane Dance with ananya tekawade On Shahrukh Khan Song Chaleya From Jawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.