"माझ्या आवाक्याबाहेर…", 'बिग बॉस मराठी'बद्दल विचारताच मराठी अभिनेत्याने दिलं 'हे' उत्तर, म्हणाला-"इंडस्ट्रीमधून मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 13:13 IST2026-01-10T13:07:01+5:302026-01-10T13:13:10+5:30
'Bigg Boss Marathi 6'मध्ये आहे की नाही? चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर मराठी अभिनेत्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत, काय म्हणाला?

"माझ्या आवाक्याबाहेर…", 'बिग बॉस मराठी'बद्दल विचारताच मराठी अभिनेत्याने दिलं 'हे' उत्तर, म्हणाला-"इंडस्ट्रीमधून मला..."
Marathi Actor Reaction On Bigg Boss Marathi 6: मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा रिअॅलिटी शो म्हणजे बिग बॉस. या शोची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस ११ जानेवारीपासून हा बहुचर्चित शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.बिग बॉस मराठीच्या या सीझनमध्ये कलाकार, इन्फ्ल्यूएन्सर किंवा राजकीय वर्तुळातील कोणत्या व्यक्ती सहभागी होणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तर काही संभाव्य स्पर्धकांच्या नावाची चर्चा देखील होताना दिसते.अशातच एका मराठी अभिनेत्याला या शोमध्ये सहभागी होण्याविषयी विचारताच त्याने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कपिल होनराव आहे.

छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतून कपिल होनराव हे नाव घराघरात पोहोचलं.या मालिकेत त्याने साकारलेलं मल्हार नावाचं पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. दरम्यान, नुकतीच कपिलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने बिग बॉस मध्ये जाण्याबद्दल त्याची प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर, कपिलला एका चाहत्याने भाई बिग बॉस मध्ये जाणार की नाही अशा प्रश्न विचारला त्याचं उत्तर देत अभिनेत्याने एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तसंच यंदाच्या सीझनमध्ये आपण जाणार नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.
कपिलने या पोस्टमध्ये काय म्हटलंय...
"बिग बॉस हे आता माझ्या आवाक्याबाहेर आहे. मिलियन फॉलोअसे कुठून आणू ? ना मी कुठल्या चॅनेलचा लीड अॅक्टर आहे,ना माझे मिलियनमध्ये फॉलोअर्स,ना माझा पीआर आहे.उलट रोज फॉलोअर्स कमी होतायत जे काही आहे, ते सगळे ऑर्गनिक आहे.एका छोट्याशा कॅरेक्टर रोलला तुम्ही इतके प्रेम दिलंत, मी इथे फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आहे."
यापुढे कपिलने लिहलं आहे, की,"मीडियानेही मला खूप प्रेम दिलं, मान दिला, सन्मान दिला.त्यांनी मला नेहमीच एका प्रसिद्ध सेलिब्रिटीसारखं वागवलं. पण, इंडस्ट्रीमधून जितकं प्रेम मिळायला हवं होतं, ते अजून मिळालेलं नाही.कधी कधी ते मला असा ट्रीट करतात"तू आहेस कोण?"त्यांना मला फक्त एकाच रोलमध्ये बघायचं आहे. टाइपकास्टमध्ये अडकायचं नाही म्हणून टेलिव्हिजनपासून थोडा दूर आहे.मी हा टाइपकास्ट होण्याचा प्रकार तोडण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून सगळीकडे एकसारखे रोल करत राहण्यापेक्षा स्वतःला थोडं थांबवून ठेवलं आहे."
माझा स्ट्रगल चालूच आहे…
दरम्यान,या पोस्टमध्ये कपिलने त्यांच्या मनातील व्यथा मांडली आहे. यामध्ये त्याने म्हटलंय,""इन्स्टाग्रामवरचे सगळे फॉलोअर्स त्या एका मल्हार मुळे आहेत.ती भूमिका मी अगदी मनापासून साकारली. आजही मला काम मागावं लागतं,आजही कास्टिंग डिरेक्टर्स माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाहीत. माझा स्ट्रगल चालूच आहे.पण याचं दुःख नाही.हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. मैं हार नहीं मानूँगा, नहीं जन् काल के कपाल पर ता-मिटा हूँ, गीत नया गाता है। मैं हार नहीं मानूँगा...!" अशी पोस्ट लिहून अभिनेत्याने त्याच्या मनातील व्यथा मांडली आहे.
कपिल होनरावच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर कपिलने अनेक मालिका आणि नाटकांमध्येही काम केलं आहे. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेनंतर कपिलने 'निवेदिता माझी ताई' मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती.