Tula Pahate Re 2 : 'तुला पाहते रे 2' येणार का? गायत्री दातारने अखेर केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 13:05 IST2023-04-09T13:04:16+5:302023-04-09T13:05:17+5:30

Tula Pahate Re 2, Gayatri Datar : सर्वांना वेड लावणाऱ्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेचा सीक्वल येणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. प्रेक्षकही या मालिकेचा दुसरा भाग कधी येणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

marathi actor gayatri datar finally talkon tula pahate re 2 | Tula Pahate Re 2 : 'तुला पाहते रे 2' येणार का? गायत्री दातारने अखेर केला खुलासा

Tula Pahate Re 2 : 'तुला पाहते रे 2' येणार का? गायत्री दातारने अखेर केला खुलासा

तुला पाहते रे’ ही छोट्या पडद्यावरील मालिका अल्पावधीत लोकप्रिय ठरली होती. सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. मालिकेत सुबोध भावेने साकारलेली विक्रांत सरंजामेची भूमिका आणि गायत्री दातारने साकारलेली ईशा निमकरची भूमिकाही प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. वय विसरायला लावणाऱ्या विक्रांत-ईशाच्या प्रेमकहाणीने तरुणाईलाही वेड लावलं होते. गायत्रीची ही पहिलीची मालिका होती आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. मालिकेचं शीर्षकगीत देखील गाजलं होतं. सर्वांना वेड लावणाऱ्या या मालिकेचा सीक्वल येणार, अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. प्रेक्षकही या मालिकेचा दुसरा भाग कधी येणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. गायत्रीला सोशल मीडियावर सर्रास हा प्रश्न विचारल्या जातो. तर आता त्याचं उत्तर मिळालं आहे.

होय, गायत्रीने नुकतंच आपल्या चाहत्यांसाठी आस्क मी एनिथिंग सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले. यावेळी नवीन काहीतरी घडणार असल्याची हिंट गायत्रीने दिली. साहजिकच चाहते क्रेझी झालेत. नवं काहीतरी म्हणजे, तुला पाहते रे २ येणार का? असा थेट प्रश्न एका चाहत्याने तिला विचारला. यावर गायत्री काय उत्तर देते, हे जाणून घेण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, गायत्रीने 'नो' असं उत्तर दिलं. म्हणजेच सध्या तरी तुला पाहते रे २ वगैरे काहीही येणार नाहीये. चाहत्यांचा यामुळे हिरमोड झाला खरा, पण गायत्री काहीतरी नवीन घेऊन येतेय म्हटल्यावर तिचे चाहते खुश्श आहेत.

Web Title: marathi actor gayatri datar finally talkon tula pahate re 2