मराठी कलाविश्वात सनई चौघडे! प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 17:35 IST2026-03-09T17:34:29+5:302026-03-09T17:35:26+5:30

ओळखलंत का या अभिनेत्याला?

marathi actor chinmay patwardhan git engaged to mrunmayee paranjape in an intimate ceremony | मराठी कलाविश्वात सनई चौघडे! प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, शेअर केले फोटो

मराठी कलाविश्वात सनई चौघडे! प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप केला साखरपुडा, शेअर केले फोटो

मराठी कलाविश्वात गेल्या काही दिवसात अनेक लग्नाचे होते. टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा गोरे काल लग्नबंधनात अडकली. अभिनेता शुभंकर जोशीसोबत तिने साताजन्माची गाठ बांधली. तसंच अभिनेत्री रुमानी खरे आणि स्तवन शिंदेचा आज लग्नसोहळा संपन्न झाला. दरम्यान 'इंद्रायणी'फेम अभिनेता चिन्मय पटवर्धननेही साखरपुडा केला. विशेष म्हणजे, कोणत्याही गाजावाजाशिवाय अत्यंत साध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. चिन्मयने सोशल मीडियाद्वारे ही बातमी शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

चिन्मय पटवर्धनने मृण्मयी परांजपेसोबत साखरपुडा केला. त्याने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तो गुडघ्यावर बसून मृण्मयीला अंगठी घालताना दिसतोय. यावेळी चिन्मयने गुलाबी रंगाचा कुर्ता, पायजमा त्यावर जॅकेट घातला होता. तर मृण्मयी प्रिंटेड पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. चिन्मयची होणारी बायको मृण्मयी नक्की कोण आहे? दोघांची कधीपासून ओळख आहे? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. 


चिन्मयने शेअर केलेल्या पोस्टवर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट करत जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चिन्मय सध्या 'भूमिका' या गाजत असलेल्या नाटकामध्ये दिसत आहे. त्याआधी तो 'इंद्रायणी' या मालिकेतून घराघरात पोहोचला होता. 'स्वामिनी' मालिकेतही तो होता. आता वैयक्तिक आयुष्यातही त्याने नवीन प्रवासाला सुरुवात केली आहे. 

Web Title: marathi actor chinmay patwardhan git engaged to mrunmayee paranjape in an intimate ceremony