आधी झाले ट्रोल, आता होतंय कौतुक; अविनाश नारकरांचा नवीन Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 13:05 IST2023-10-11T13:04:02+5:302023-10-11T13:05:25+5:30

अविनाश नारकर यांचं वय ५७ वर्ष आहे. याही वयात ते कमालीचे फिट आहेत.

marathi actor avinash narkar new video netizens praised him for his fitness | आधी झाले ट्रोल, आता होतंय कौतुक; अविनाश नारकरांचा नवीन Video व्हायरल

आधी झाले ट्रोल, आता होतंय कौतुक; अविनाश नारकरांचा नवीन Video व्हायरल

मराठी अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) सध्या त्यांच्या रील्समुळे चर्चेत असतात. विचित्र हावभाव आणि डान्स केल्याने ते सतत ट्रोल होत असतात. इतकंच नाही तर त्यांची बायको आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकरहीट्रोल झाल्या आहेत. आता त्यांनी नवीन व्हिडिओ अपलोड केला असून यावेळी मात्र नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय. काय आहे तो व्हिडिओ?

अविनाश नारकर यांचं वय ५७ वर्ष आहे. याही वयात ते कमालीचे फिट आहेत. त्यांचे वर्कआऊट, रनिंग आणि योगा करतानाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच त्यांनी व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. यात त्यांचा स्टॅमिना आणि एकंदर फिटनेस बघून नेटकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलंय. याशिवाय पत्नी ऐश्वर्या नारकर यांनीही त्यांच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. 

अविनाश नारकर अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलच झाले आहेत. अगदी मध्यंतरी त्यांनी 'आमच्या पप्पांनी गंपती आणला' या गाण्यावरही वेड्यासारखं नाचत व्हिडिओ केला होता. यानंतर सोशल मीडियावर ट्रोलर्सने त्यांना लक्षच केलं होतं. आता मात्र त्यांचं कौतुकही होताना दिसतंय. त्यांचा हाही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Web Title: marathi actor avinash narkar new video netizens praised him for his fitness