'डॉक्टर, त्याचा आवाज जातोय', अतुल परचुरेंनी कॅन्सरवर कशी मात केली? पत्नी सोनिया म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 14:31 IST2024-08-18T14:30:09+5:302024-08-18T14:31:30+5:30

कसा घडला हा चमत्कार?

Marathi actor Atul Parchure wife Sonia Parchure reveals how he battle with cancer | 'डॉक्टर, त्याचा आवाज जातोय', अतुल परचुरेंनी कॅन्सरवर कशी मात केली? पत्नी सोनिया म्हणाल्या...

'डॉक्टर, त्याचा आवाज जातोय', अतुल परचुरेंनी कॅन्सरवर कशी मात केली? पत्नी सोनिया म्हणाल्या...

पडद्यावर सर्वांना खळखळून हसवणारे अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) नुकतेच कॅन्सर सारख्या गंभीर आजारातून बरे झाले आहेत. या काळात त्यांचं वजनही झपाट्याने कमी झालं होतं. त्यांना ओळखणंही कठीण झालं होतं. यावेळी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांना मदत केली. त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. याचं एकमेव कारण म्हणजे अतुल परचुरे यांचा स्वभाव सर्वांनाच आपलंसं करणारा आहे. त्यामुळे त्यांच्या कठीण काळात आपोआपच त्यांना साथ मिळाली.  त्यांची पत्नी सोनिया परचुरे (Sonia Parchure) यांनी नुकतंच एका मुलाखतीत भावना व्यक्त केल्या.
 
'आरपार' या पॉडकास्टमध्ये सोनिया परचुरे म्हणाल्या, "अतुलचा आवाज जसा जसा कमी व्हायला लागला तसं मी डॉक्टरांना म्हणायचे की ओ ह्याचा आवाज गेला. असं नाही चालणार. अतुलचा आवाज महत्वाचा आहे अहो. मग ते म्हणायचे हो हो मी समजू शकतो. मला तेव्हा असं वाटायचं की मी कसं याला बाहेर काढू. आणि आपण ना कितीही बायको वगरे सगळं असलं तरी काय त्या माणसाला यातना होतात हे आपण फक्त बाहेरुन बघून काहीही करु शकत नाही. मला असं वाटतं की किती आपण स्वत:ला शहाणे समजतो की मी हे करेन पण इथे आपण काहीच करु शकत नाही. हतबल होतो."

त्या पुढे म्हणाल्या,  "मी एकही क्षण नृत्य करताना, शिकवताना प्रतारणा केलेली नाही. एका क्षणाचीही प्रतारणा नाही. अतुलचंही तसंच आहे. समोर  माणूस भेटला आणि मी असं म्हणतीये तर मला असंच म्हणायचंय. तसाच अतुलही आहे त्यामुळे ना खूप लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. अतुल बरा झाला पाहिजे म्हणून प्रार्थना केल्या इतक्या लोकांना ते एकत्रितपणे वाटलं की तो बरा झाला पाहिजे. ते खरं वागणं, सच्चाई कामी येते आणि ती आमच्याबाबतीत खरंच कामी आली."

Web Title: Marathi actor Atul Parchure wife Sonia Parchure reveals how he battle with cancer