"या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं, हे राजकारण्यांनी सांगावं", पोस्टमधून मराठी अभिनेत्याचा सणसणीत टोला

By कोमल खांबे | Updated: June 7, 2025 09:58 IST2025-06-07T09:57:53+5:302025-06-07T09:58:22+5:30

अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावरुन खेळण्यातल्या पेग्विंनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खोचक पोस्ट लिहिली आहे.

marathi actor astad kale shared criptic post on ranichi baug penguin marathi name row | "या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं, हे राजकारण्यांनी सांगावं", पोस्टमधून मराठी अभिनेत्याचा सणसणीत टोला

"या पेंग्विनचं नाव काय ठेवायचं, हे राजकारण्यांनी सांगावं", पोस्टमधून मराठी अभिनेत्याचा सणसणीत टोला

काही दिवसांपूर्वीच राणीच्या बागेतील हंबोल्ट पेंग्विनच्या जोड्यांनी आणखी तीन पिल्लांना जन्म दिला. त्यांची नावे नॉडी, टॉम आणि एक मादी पिल्लाला 'पिंगु' अशी ठेवण्यात आली. मात्र या नावावरून नवा वाद निर्माण झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढून प्रशासनाला जाब विचारत पेग्विंनच्या पिलांची मराठी नावे ठेवण्यास सांगितली. यावरुन आता मराठी अभिनेता आस्ताद काळेने पोस्ट शेअर करत राज्यकर्त्यांना सणसणीत टोला लगावला आहे. 

आस्तादने त्याच्या सोशल मीडियावरुन खेळण्यातल्या पेग्विंनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने खोचक पोस्ट लिहिली आहे. "हे पेंग्विन माझ्या मुलाचं, THUNDER/कडकडाट/गडगडाट याचं लाडकं खेळणं आहे. तर याचं नाव काय ठेवावं हे कृपया राज्यकर्त्यांनी/त्यांच्या पक्षातील जाणकार संस्कृतीरक्षकांनी सांगावं. ता.क:- हे आणायला जाता-येतानाच्या रस्त्यावर खूप खड्डे होते. आजही आहेत. पाणी तुंबतंही‌", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. 


दरम्यान, राणीच्या बागेतील पेंग्विनसाठी मोल्ड, डोनॉल्ड, डेसी, पोपॉय, ऑलिव्ह, बबल, ओरिओ, बिंगो, निमो, जेरी, फ्लिपर, अॅलेक्सा, सिरी, डोरा, कोको आणि स्टेला अशी नावे देण्यात आली आहेत. राणी बागेतील पेंग्विनच्या पिल्लांची नावे प्रसिद्ध कार्टून पात्रांवरून देण्यात आली आहेत. प्रशासनाचा यामध्ये कोणताही राजकीय अथवा भाषिक हेतू नाही.लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या कार्टून विश्वातील नावे वापरल्यामुळे मुलांना पेंग्विन अधिक आवडतील आणि त्यांच्याशी जोडले जातील, हा त्यामागचा उद्देश आहे. या पिल्ल्यांची नावासहीत माहिती दिल्लीकडे दिली आहेत. त्यामुळे या नावांमध्ये आता कोणत्याही प्रकारचे बदल होऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण राणीची बाग प्रशासनाकडून देण्यात आले आहे. 

Web Title: marathi actor astad kale shared criptic post on ranichi baug penguin marathi name row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.