फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार! मराठमोळ्या अभिनेत्याने मातीपासून बनवली भांडी, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 13:58 IST2024-02-24T13:58:25+5:302024-02-24T13:58:59+5:30

प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने मातीपासून घडवली भांडी, व्हिडिओ होतोय कौतुकाचा वर्षाव

marathi actor ajinkya nanaware made pottery pots shared video netizens react | फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार! मराठमोळ्या अभिनेत्याने मातीपासून बनवली भांडी, व्हिडिओ व्हायरल

फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार! मराठमोळ्या अभिनेत्याने मातीपासून बनवली भांडी, व्हिडिओ व्हायरल

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अजिंक्य ननावरे. या मालिकेत अजिंक्य मुख्य भूमिका साकारत आहे. अद्वैत ही भूमिका साकारून अजिंक्य प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. अजिंक्य सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच तो वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही देत असतो. 

अजिंक्यने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो कुंभारकाम करताना दिसत आहे. मातीला आकार देऊन त्यापासून भांडे बनवताना अजिंक्य दिसत आहे. त्याने फिरत्या चाकावरती मातीला आकार देत अजिंक्यने मातीपासून शोभेच्या वस्तू बनवल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्याचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. अजिंक्यच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे. 

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलेल्या अजिंक्यला 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 'तू जिवाला गुंतवावे', 'कुसूम' या मालिकांमध्येही अजिंक्य मुख्य भूमिकेत दिसला होता. 'पावनखिंड' या सिनेमातील त्याच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. अजिंक्यने नुकतंच अभिनेत्री शिवानी सुर्वेसोबत विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

Web Title: marathi actor ajinkya nanaware made pottery pots shared video netizens react