गोड बातमी! संकर्षण कऱ्हाडेच्या घरी चिमुकल्याचं आगमन, मराठी अभिनेता झाला बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:39 IST2026-03-16T07:38:57+5:302026-03-16T07:39:20+5:30

मराठी कलाविश्वातून एक गोड बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आणि अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे बाबा झाला आहे.

marathi actor adhokshaj karhade blessed with baby boy shared post | गोड बातमी! संकर्षण कऱ्हाडेच्या घरी चिमुकल्याचं आगमन, मराठी अभिनेता झाला बाबा

गोड बातमी! संकर्षण कऱ्हाडेच्या घरी चिमुकल्याचं आगमन, मराठी अभिनेता झाला बाबा

मराठी कलाविश्वातून एक गोड बातमी समोर येत आहे. लोकप्रिय अभिनेत्याच्या घरी पाळणा हलला आहे. संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ आणि अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे बाबा झाला आहे. अधोक्षजला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. संकर्षण कऱ्हाडे काका झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अधोक्षजने ही गूडन्यूज चाहत्यांना दिली आहे. अधोक्षजने लेकासोबतचा फोटो शेअर केला आहे. 

बाबा झाल्याने अधोक्षजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पोस्टमधून त्याने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणतो, "चिरंजीव आले! १० फेब्रुवारी २०२६, आई-बाबांच्या लग्नाच्या ४१व्या वाढदिवशी आमचे आई-बाबा परत आणि चैतालीचे आई-बाबा पहिल्यांदा आजी-आजोबा झाले!  आता सगळ्यांना उत्सुकता आहे “अधोक्षजच्या मुलाचं नाव काय असेल”? ह्याची! 😂 नाव ठरवलं आहे. छान आणि अर्थपूर्ण आहे. बारसं झालं की सांगेनच. पण सद्ध्या पाळण्यातलं नाव “नारायण” ठेवलं आहे! 😇 शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम असूद्या". 


अधोक्षज हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. त्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. लाखात एक आमचा दादा, पिंकीचा विजय असो या मालिकांमध्ये तो दिसला होता. कमळी या मालिकेत अधोक्षज सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहे. काही नाटकांमध्येही त्याने काम केलं आहे. लाडकी विहीण योजना या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज आहे. 

Web Title : मराठी अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे बने पिता, संकर्षण कऱ्हाडे बने चाचा।

Web Summary : अभिनेता अधोक्षज कऱ्हाडे और पत्नी ने 10 फरवरी को एक बच्चे का स्वागत किया, जो अधोक्षज के माता-पिता की शादी की सालगिरह है। कऱ्हाडे ने सोशल मीडिया पर खबर साझा की, जिसमें बताया गया कि उन्होंने आधिकारिक नामकरण समारोह तक बच्चे का उपनाम नारायण रखा है। अधोक्षज 'कमली' जैसे टेलीविजन धारावाहिकों में भूमिकाओं के लिए जाने जाते हैं।

Web Title : Marathi actor Adhokshaj Karhade welcomes baby boy; Sankarschan Karhade becomes uncle.

Web Summary : Actor Adhokshaj Karhade and wife welcomed a baby boy on February 10th, the wedding anniversary of Adhokshaj's parents. Karhade shared the news on social media, revealing they've nicknamed the baby Narayan until the official naming ceremony. Adhokshaj is known for roles in television series like 'Kamali'.