चित्रपटाच्या सेटवर भेट ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार! अशी फुलली आशय-सानियाची लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 15:33 IST2025-11-23T15:09:07+5:302025-11-23T15:33:07+5:30
आशय-सानियाची फिल्मी लव्हस्टोरी, 'अशी' झाली होती पहिली भेट

चित्रपटाच्या सेटवर भेट ते खऱ्या आयुष्यातील जोडीदार! अशी फुलली आशय-सानियाची लव्हस्टोरी
Aashay Kulkarni Lovestory: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आशय कुलकर्णी आजवर अनेक मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 'माझा होशील ना', 'पहिले न मी तुला' यांसारख्या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. सर्व मालिकांमधील त्यांच्या प्रेमकहाण्यांची चर्चा होते. पण, फक्त ऑनस्क्रिन नाहीच तर तर अभिनेत्याची ऑफस्क्रिन प्रेमकहाणी देखील तितकीच खास आहे. याबाबत त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
आशय कुलकर्णी आणि त्याची पत्नी सोनिया गोडबोल या दोघांनी 'अनुरुप विवाह संस्था' ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रेमकहाणीविषयी सांगितलं. त्यादरम्यान, अभिनेता म्हणाला, "२०२४ मध्ये आम्ही एका चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो. त्यामध्ये आम्ही नवरा-बायकोचा रोल केला होता. आमचा त्यात काही सीन नव्हता पण, आम्हाला फोटोत एकत्र दाखवलं होतं. तेव्हा असं वाटलंच नव्हतं की पुढे काही घडेल."
त्यानंतर आशय पहिल्या भेटीचा किस्सा सांगत म्हणाला,"पहिल्यांदा शूटिंगवेळी मी तिला भेटलो होतो. त्यानंतर तिची जी डान्स गुरु आहे म्हणजे ती भरतनाट्यम शिकवते. प्रिया जोशी म्हणून तिचं नाव आहे. तर तिचा नवरा समीर जोशी हा दिग्दर्शक आहे. त्याच्या सिनेमाच्या सेटवर मी आणि सानिया पहिल्यांदा भेटलो. त्या सेटवर मला कळलं की ही माझ्या बायकोची भूमिका साकारणार आहे. तिथे आमची मैत्री झाली आणि मग पुढे गोष्टी पुढे वाढत गेल्या."
अभिनेता आशय कुलकर्णी आणि सानिया गोडबोले २ डिसेंबर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. आशय आणि सानियाचं लग्न दापोलीतील समुद्रकिनारी पार पडला होता.
त्यांच्या सुखी संसाराला ३ वर्ष पूर्ण झाली आहेत.