मनवीर गुर्जर अन् नीतिभा कौलची घराबाहेर बहरली मैत्री; डिस्को डान्सचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 18:50 IST2017-02-07T13:18:15+5:302017-02-07T18:50:07+5:30

बिग बॉसचा १०चा विनर मनवीर गुर्जर आणि घरातील त्याची क्लोज मैत्रिण नीतिभा कौल यांची मैत्रिण घराबाहेरही बहरताना दिसत आहे. ...

Manveer Gujjar and Dhrishil Kauli are friends outside; Disco Dancer Video Viral | मनवीर गुर्जर अन् नीतिभा कौलची घराबाहेर बहरली मैत्री; डिस्को डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मनवीर गुर्जर अन् नीतिभा कौलची घराबाहेर बहरली मैत्री; डिस्को डान्सचा व्हिडीओ व्हायरल

ग बॉसचा १०चा विनर मनवीर गुर्जर आणि घरातील त्याची क्लोज मैत्रिण नीतिभा कौल यांची मैत्रिण घराबाहेरही बहरताना दिसत आहे. बहुधा बिग बॉसच्या घरात निर्माण झालेले नाते, घराबाहेर फार काळ टिकत नाही. मात्र या दोघांची मैत्री दिवसेंदिवस बहरताना दिसत आहे. नुकतेच हे दोघे दिल्ली येथील डिस्कोमध्ये जोरदार पार्टी सेलिब्रेट करताना बघावयास मिळाले. यांच्याबरोबर मनू पंजाबी आणि त्याची गर्लफ्रेंड पीकू यांनीदेखील काही दिवसांपूर्वीच नीतिभाची भेट घेऊन तिच्याबरोबर पार्टी सेलिब्रेट केली होती. 
 
बिग बॉसच्या घरात मनवीर गुर्जर अतिशय अ‍ॅग्रसिव्ह स्वभावासाठी ओळखला गेला. मात्र आईच्या निधनामुळे घराबाहेर पडलेल्या मनू पंजाबीच्या अनुपस्थितीत मनवीर आणि नीतिभा कौल यांच्यातील मैत्री बहरली होती. दोघांमध्ये काहीतरी केमिस्ट्री रंगत असल्याचीही चर्चा रंगली होती. मात्र मनू घरात परतताच त्यांच्यात दरार निर्माण झाली. पुढे मनवीरनेच नरमाईची भूमिका घेत नीतिभाशी जवळीकता साधली होती. ही जवळीकता घराबाहेर कायम असल्याचे दिसत आहे. 

बिग बॉसमध्ये मनवीरच्या सहवासामुळेच नीतिभाला अधिक काळ घरात राहता आले. प्रेक्षकांनी ही जोडी पसंत केल्याने त्याचा मनवीर व नीतिभाला फायदा झाला होता. त्यातच मनवीरच्या वहिणीने या दोघांच्या मैत्रीविषयी आपण सकारात्मक असल्याचे जाहीर केल्याने जणू काही या दोघांना खुल्लमखुल्ला फिरण्याचा जणू काही परवानाच मिळाला होता. त्याचबरोबर मनवीर हा विवाहित असल्याचे समोर आल्याने या दोघांमधील ही मैत्री आणखी किती काळ बहरणार याविषयीही आता चर्चा रंगली आहे. 

दरम्यान, मनवीर आणि नीतिभा यांनी जोरदार पार्टी सेलिब्रेट केली असून, पार्टीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून, त्यांच्यातील नात्यांविषयी पुन्हा चर्चा रंगली आहे. व्हिडीओमध्ये मनवीर आणि नीतिभा डिस्को करताना बघावयास मिळत आहेत. व्हिडीओबरोबरच मनवीरने नीतिभाबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे. घराबाहेर पडल्यानंतर नीतिभा मनू पंजाबी याच्याही कॉन्टॅक्टमध्ये आहे. जयपूरचा असलेला मनू नुकताच दिल्ली येथे आला होता. यावेळी त्याने नीतिभा कौल हिची भेट घेतली होती. दोघांनी एकत्र फोटोशेषनही केले होते. त्याचे काही फोटोज् इन्स्टाग्रामवर शेअरही केले आहेत. 

नीतिभा मनू आणि मनवीर या दोघांच्याही कॉन्टॅक्टमध्ये असली तरी घरात सख्या भावासारखे राहणारे मनू पंजाबी आणि मनवीर गुर्जर घराबाहेर पडल्यानंतर एकदाही एकत्र बघावयास मिळाले नाहीत. दोघांनी एकदाही एकमेकांची भेट घेतली नसल्याने त्यांच्यातील मैत्री फक्त शोपुरतीच मर्यादित होती का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.