या मालिकेत मानव गोहिल खलनायकाच्या भूमिकेत झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 16:10 IST2017-05-08T10:40:24+5:302017-05-08T16:10:24+5:30
लवकरच टीव्ही अभिनेता मानव गोहिल मासूम या मालिकेतून एका वर्षानंतर पुन्हा एकदा नवीन मालिका मासूममधून कमबॅक करतोय.या मालिकेत तो ...

या मालिकेत मानव गोहिल खलनायकाच्या भूमिकेत झळकणार
ल करच टीव्ही अभिनेता मानव गोहिल मासूम या मालिकेतून एका वर्षानंतर पुन्हा एकदा नवीन मालिका मासूममधून कमबॅक करतोय.या मालिकेत तो खलनायकाची भूमिका साकारणार असून या शोमध्ये तो विक्रांत मुख्य खलनायकाची भूमिका साकारेल. मासूमची कथा ही किचन पॉलिटिक्सपेक्षा वेगळी आहे. हा शो आहे एक सूडनाट्य, ज्यात एक ८ वर्षीय बालक न्यायाची याचना करेल. सूत्रांनुसार, निर्मात्यांनी मानवला खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारले आहे कारण त्यांच्या मते तो या भूमिकेला उत्तम न्याय देऊ शकेल. याविषयी मानवला विचारले असता तो म्हणाला, “अजूनतरी काही नक्की नाहीये.हे खरे आहे की या मालिकेसाठी मला विचारण्यात आले आहे. मात्र मी सुचवलेल्या गोष्टींवर मालिकेच्या टीमकडून कोणत्याही प्रकारचे ठोस उत्तर मिळालेले नाहीय. त्यामुळे सध्या तरी फक्त यावर फक्त विचारच सुरू आहे. ज्या दिवशी ही मालिका करणार त्यावेळी ही आनंदाची बातमी मी सगळ्यांसह शेअर करणार असल्याचे मानवने म्हटले आहे. ”यापूर्वी मानव खिडकी मालिकेतही पाहायला मिळाला होता. या मालिकेत वेगवेगळ्या कथेनुसार वेगवेगळ्या व्यक्तिरेखांसह वेगेवेगळे कलाकार झळकले होते त्यानुसार .टिफिन चोर या कथेत अभिनेता मानव गोहिल झळकला होता. मानवने गेल्यावर्षी 'यम है हम ही मालिका केली होती'. या मालिकेतील त्याच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले होते. ही मालिका संपल्यानंतर कित्येक महिन्यांनंतर खिडकी या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर परतला होता.खिडकी या मालिकेनंतर फारशा चांगल्या ऑफर्स नसल्यामुळे त्याने थोडा ब्रेक घेतला होता.