'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 16:51 IST2023-06-20T16:51:15+5:302023-06-20T16:51:48+5:30
Ajinkya Raut : 'मन उडू उडू झालं' मालिकेत इंद्राच्या भूमिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत घराघरात पोहचला. या मालिकेनंतर आता तो लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे.

'मन उडू उडू झालं' फेम अजिंक्य राऊतचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या मालिकेत
'मन उडू उडू झालं' मालिकेत इंद्राच्या भूमिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) घराघरात पोहचला. या मालिकेनंतर आता तो लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. तो सोनी मराठी वाहिनीवरील 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' (Abol Pritichi Ajab Kahani) या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. त्याच्याबरोबर गुणी अभिनेत्री जान्हवी तांबट सुद्धा झळकणार आहे.
अभिनेता अजिंक्य राऊत पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचे या आधीचे काम प्रेक्षकांना खूपच भावले होते. त्याला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते मनापासून वाट पाहत होते. अजिंक्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेतून दिसणार आहे. मालिकेचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना विशेष आवडतो आहे. कारण मालिकेची नायिका जान्हवी तांबट ही वेगळ्या रूपात दिसते आहे. ती चक्क एका बॉडीगार्डच्या वेशात दिसते आहे, तेही पुरुष बॉडीगार्डच्या वेशात. आता हा बॉडीगार्ड कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. या मालिकेत अजून कोण कलाकार असतील आणि एकंदर मालिका कशा प्रकारे प्रेक्षकांसमोर येईल याची प्रेक्षक वाट बघताहेत. ही मालिका १७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
विठू माऊली या मालिकेने अजिंक्य राऊतला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यानंतर तो हृता दुर्गुळे सोबत मन उडू उडू झालं या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसला होता. त्याने मालिकेव्यतिरिक्त चित्रपटातही काम केले आहे. अजिंक्यने टकाटक २ चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातील किसिंग सीनमुळे तो खूप चर्चेत आला होता.