'मन उडू उडू झालं' फेम हृता-अजिंक्यची पुन्हा जमली जोडी, थेट पोहचले लंडनला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2022 17:08 IST2022-10-13T17:07:26+5:302022-10-13T17:08:43+5:30
Hruta Durgule And Ajinkya Raut : 'मन उडू उडू झालं' या मालिकेनं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील इंद्रा-दीपू जोडी खूपच लोकप्रिय झाली होती. ही मालिका संपल्यानंतर अजूनही प्रेक्षक या जोडीला खूप मिस करत आहेत.

'मन उडू उडू झालं' फेम हृता-अजिंक्यची पुन्हा जमली जोडी, थेट पोहचले लंडनला
'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Jhala) या झी मराठीवरील मालिकेनं काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील इंद्रा-दीपू जोडी खूपच लोकप्रिय झाली. ही मालिका संपल्यानंतर अजूनही प्रेक्षक या जोडीला खूप मिस करत आहेत. पण आता पुन्हा एकदा इंद्रा-दीपूची जोडी जमली आहे. मन उडू उडू झालं मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गळे (Hruta Durgule) आणि इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) हे दोघे एका नव्या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. याची माहिती हृताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत दिली आहे.
हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत कन्नी या सिनेमात एकत्र काम करताना दिसणार आहेत. हृताने अजिंक्यसोबत फोटो शेअर करत फायनली आम्हाला एकत्र फोटो काढण्याची संधी मिळाली असं म्हटले. त्यांच्या या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे. तसेच हृताने लंडनमधले काही फोटो पोस्ट केलेत जे अजिंक्यने काढलेत. ही बातमी सोशल मीडियावर शेअर होताच त्यांच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे.
मन उडू उडू झालं ही मालिका खूप गाजली. या मालिकेतील दीपू आणि इंद्राची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने निरोप घेतला. टीआरपी चांगला असूनही ही मालिका संपली तेव्हा प्रेक्षक खूप नाराज झाले होते. जेव्हा मन उडू उडू झालं ही मालिका संपणार होती तेव्हा अजिंक्य आणि हृता यांनी त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधला. त्यावेळी, आम्ही भविष्यात नक्कीच एकत्र दिसू असं दोघं म्हणाले होते. 'कन्नी' या चित्रपटात ही जोडी एकत्र झळकणार आहे. हृताच्या वाढदिवशी १२ सप्टेंबर रोजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
'मन उडू उडू झालं' मालिकेच्या वेगळ्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत इंद्रा-दिपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली असून या जोडीने प्रेक्षकांच्या मनात वेगळं असं स्थान निर्माण केले. सोशल मीडियावरदेखील या जोडीचा तसेच या मालिकेचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.