'मन उडू उडू झालं'फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला लग्नसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 10:04 IST2023-12-10T10:03:00+5:302023-12-10T10:04:34+5:30

Vinamra bhabal: 'मन उडू उडू झालं' मालिकेतील प्रत्येक कलाकाराने या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती.

'Mann Udu Udu Jala' fame actor tied the knot; The wedding ceremony was held in grandeur | 'मन उडू उडू झालं'फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला लग्नसोहळा

'मन उडू उडू झालं'फेम अभिनेत्याने बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला लग्नसोहळा

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली. ही मालिका संपून आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, आजही त्यातील कलाकार चर्चेत येतात. यामध्येच आता या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्याच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या मालिकेतील सत्तू म्हणजेच अभिनेता विनम्र भाबल याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. विनम्रच्या लग्नसोहळ्याला मन उडू उडूच्या सगळ्या टीमने हजेरी लावली होती. ८ डिसेंबर रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात सत्तूचा लग्नसोहळा पार पडला. विनम्रच्या पत्नीचं नाव पूजा आहे.

दरम्यान, विनम्रच्या लग्नसोहळ्यात हृता दुर्गुळेसह रिना मधुकर, पूर्णिमा तळवलकर, प्राजक्ता परब या कलाकारांनी हजेरी लावली होती. सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराईचे वारे वाहत आहेत. यापूर्वी अलिकडेच शुभंकर एकबोटे-अमृता बने, प्रसाद जावेद, अमृता देशमुख, सुरुची अडारकर- पियुष रानडे या जोड्यांनी लग्नगाठ बांधली आहे.

Web Title: 'Mann Udu Udu Jala' fame actor tied the knot; The wedding ceremony was held in grandeur