n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">महेक ही सौरभ तिवारी यांची मालिका काहीच दिवसांत सुरू होणार आहे. सौरभने याआधी मधुबाला - एक इश्क एक जुनून, रंगरसिया यांसारख्या प्रसिद्ध मालिकांची निर्मिती केली आहे. महेक या मालिकेत समीक्षा जैस्वाल प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. समीक्षा ही इंदोरची असून तिची ही पहिलीच मालिका आहे. महेक या मालिकेचे अधिकाधिक चित्रीकरण हे दिल्लीत होणार असून हिंदी रंगभूमीवरील अनेक कलाकार या मालिकेचा भाग असणार आहेत. त्याचसोबत 24 करोल बाग, प्रीत से बंधी ये डोरी राम मिलाए जोडी यांसारख्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेल्या मनित जौरालाही या मालिकेसाठी विचारण्यात आले आहे. मनितने अद्याप या मालिकेसाठी होकार दिला नसला तरी प्रोडक्शन हाऊससोबत त्याची चर्चा सुरू आहे.