Video: मनिषा रानीची कमाल, बर्फावर केला डान्स; कधीही पाहिला नसेल असा परफॉर्मन्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 05:12 PM2024-02-26T17:12:22+5:302024-02-26T17:12:59+5:30

मनिषा रानी फायनलिस्ट आहे आणि तिच्या डान्स परफॉर्मन्सने स्टेजवर अक्षरश: आग लावत आहे.

Manisha Rani danced on ice A performance on Jhalak Dikhla Jaa that has never been seen before Farah Khan praised | Video: मनिषा रानीची कमाल, बर्फावर केला डान्स; कधीही पाहिला नसेल असा परफॉर्मन्स!

Video: मनिषा रानीची कमाल, बर्फावर केला डान्स; कधीही पाहिला नसेल असा परफॉर्मन्स!

बिहारची मनिषा रानी (Manisha Rani) सध्या 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhla Jaa) शो गाजवत आहे. तिच्या दमदार नृत्याने परिक्षकांसोबतच सर्वांचंच मन जिंकलं आहे. मनिषा रानीने खूप कमी वयात आपल्या टॅलेंटने हे यश मिळवलं आहे. अत्यंत गरिबीतून ती इथपर्यंत पोहोचली आहे. आज तिला संपूर्ण देश ओळखतो. मनिषाने 'झलक दिखला जा'मध्ये नुकताच एक परफॉर्मन्स दिला जो आजपर्यंत कोणीही दिला नाही. तिच्या या परफॉर्मन्सचं सगळीकडेच कौतुक होतंय.

सध्या 'झलक दिखला जा' शो फिनालेच्या जवळ पोहोचला आहे. मनिषा रानी फायनलिस्ट आहे आणि स्टेजवर अक्षरश: आग लावत आहे. लेटेस्ट परफॉर्मन्समध्ये मनिषाने बर्फावर डान्स केला आहे. असा परफॉर्मन्स आजपर्यंत कधीच कोणी केलेला नाही. तिला मलायका अरोरा, अर्शद वारसी, फराह खान यांनी स्टँडिंग ओवेशन दिले. 'मी असा परफॉर्मन्स आजपर्यंत पाहिला नाही' अशी प्रतिक्रिया फराह खानने दिली. मनिषाने 'ओम शांती ओम' मधील 'मै अगर कहूँ' गाण्यावर परफॉर्म केलं. तिचा हा अॅक्ट सर्वांनाच आवडला. सध्या तिचा परफॉर्मन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

'झलक दिखला जा' चा फिनाले ३ मार्च रोजी पार पडणार आहे. याकडे प्रेक्षकांचंही लक्ष लागलं आहे. मनिषा रानीचं पारडं सध्या जड दिसत आहे. नुकतंच 'काश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनीही मनिषा रानीची खूप स्तुती केली. सध्या ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.'बिग बॉस ओटीटी 2' मधून ती घराघरात पोहचली होती. 

Web Title: Manisha Rani danced on ice A performance on Jhalak Dikhla Jaa that has never been seen before Farah Khan praised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.