​पवित्र रिश्ता या मालिकेत झळकलेला मनिष नागदेव आणि सृष्टी रोडेने केला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2017 14:26 IST2017-02-25T08:56:30+5:302017-02-25T14:26:30+5:30

पवित्र रिश्ता या मालिकेत झळकलेल्या मनिष नादगेवने नुकताच त्याची प्रेयसी सृष्टी रोडेसोबत साखरपुडा केला. सृष्टीदेखील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून ...

Manish Nagdev and Srishti Rhode, starring Kareena Chekharpuda, in this series of sacred relation | ​पवित्र रिश्ता या मालिकेत झळकलेला मनिष नागदेव आणि सृष्टी रोडेने केला साखरपुडा

​पवित्र रिश्ता या मालिकेत झळकलेला मनिष नागदेव आणि सृष्टी रोडेने केला साखरपुडा

ित्र रिश्ता या मालिकेत झळकलेल्या मनिष नादगेवने नुकताच त्याची प्रेयसी सृष्टी रोडेसोबत साखरपुडा केला. सृष्टीदेखील छोट्या पडद्यावरील अभिनेत्री असून तिने छोटी बहू, पुनर्विवाह, शोभा सोमनाथ की यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्या दोघांनी आपल्या अगदी जवळच्या नातलग आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा केला.
मनिष आणि सृष्टी गेल्या तीन वर्षांपासून नात्यात आहेत. त्यांनी नुकताच साखरपुडा केला असला तरी त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप ठरली नाहीये. ते दोघे या वर्षाच्या अखेरीपर्यंत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या तरी त्या दोघांनी आपल्या करियरवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. याविषयी मनिष सांगतो, "आम्ही दोघांनी नुकताच साखरपुडा केला हे खरे असले तरी लग्न कधी करायचे याचा निर्णय आम्ही अजून तरी घेतलेला नाही. या वर्षाच्या अखेरीपर्यंत लग्न करूया असा आमच्या दोघांचा विचार सुरू आहे. तोपर्यंत एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवायचा असे आम्ही ठरवले आहे. आमच्या नात्याला तीन वर्षांहूनही अधिक काळ झाला असला तरी आम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतो असे मी कधीच म्हणणार नाही. एकमेकांना जाणून घ्यायचा हा काही जो प्रवास आहे, तो खूपच छान असतो असे मला वाटते. सृष्टीविषयी मला जितके अधिक कळते, तितके जास्त मी तिच्या प्रेमात पडतो असे मला वाटते. 
2016-17मध्ये आतापर्यंत अनेक टिव्हीवरील कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत, कविता कौशिक, पंछी बोहरा, अमित दौलावत, श्रीना सम्ब्याल यांसारख्या अनेक कलाकारांनी गेल्या काही महिन्यात लग्न केले आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर लग्न करण्याचा मौसम आला आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. 



Web Title: Manish Nagdev and Srishti Rhode, starring Kareena Chekharpuda, in this series of sacred relation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.