'अजून खाली नेस बाई'; कंबरेखाली साडी नेसल्यामुळे मराठी अभिनेत्री ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 13:30 IST2023-06-25T13:29:41+5:302023-06-25T13:30:15+5:30

Shweta kharat: ट्रोल करणाऱ्याला श्वेताने सडेतोड उत्तर दिलं आहे.

man zhala bajind fame actress shweta kharat shared bold photo | 'अजून खाली नेस बाई'; कंबरेखाली साडी नेसल्यामुळे मराठी अभिनेत्री ट्रोल

'अजून खाली नेस बाई'; कंबरेखाली साडी नेसल्यामुळे मराठी अभिनेत्री ट्रोल

'मन झालं बाजिंद' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्वेता खरात (shweta kharat). सोशल मीडियावर सक्रीय असलेली श्वेता कायम चाहत्यांसोबत तिचे नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच तिचा एक नवीन फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर केला. मात्र, हा फोटो पाहिल्यावर काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं. या ट्रोलर्सला श्वेतानेही तिच्या हटके स्टाइलमध्ये उत्तरं दिलं आहे.

काही दिवसांपूर्वी श्वेताने इन्स्टाग्रामवर तिचा साडीतील एक फोटो शेअर केला होता. या फोटोवर सेलिब्रिटींसह अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. यात एका नेटकऱ्याने तिला ट्रोल केलं.  'अजून खाली नेस बाई...' असं म्हणत एकाने तिच्या या फोटोवर कमेंट केली. विशेष म्हणजे या ट्रोलरला श्वेतानेही त्याच शब्दांत उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाली श्वेता?

'नको काकु, ती तुमची स्पेशालिटी आहे, तुम्हीच नेसा... लव यू काकू...', अशी उपहासात्मक कमेंट करत श्वेताने या युजरला उत्तर दिलं. श्वेताने दिलेल्या या उत्तराची सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
 

Web Title: man zhala bajind fame actress shweta kharat shared bold photo