'मन उडू उडू झालं' फेम हृता दुर्गुळेचा नवऱ्यासोबतचा रोमँटिक व्हिडीओ आला समोर, म्हणाली - 'या प्रवासात...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 14:48 IST2022-07-09T14:47:01+5:302022-07-09T14:48:02+5:30
Hruta Durgule : अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने सोशल मीडियावर पती प्रतीक शाहसोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची चर्चा होताना दिसते आहे.

'मन उडू उडू झालं' फेम हृता दुर्गुळेचा नवऱ्यासोबतचा रोमँटिक व्हिडीओ आला समोर, म्हणाली - 'या प्रवासात...'
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule)ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील मन उडू उडू झालं (Man Udu Udu Jhala) या मालिकेत काम करताना दिसते आहे. या मालिकेत तिने दीपूची भूमिका निभावली आहे आणि ही भूमिका रसिकांच्या खूप पसंतीस उतरली आहे. ती मालिकेशिवाय बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. नुकतेच हृताने प्रियकर प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता तिने प्रतीक शाहसोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच हृताने नवरा प्रतीक शाहसोबतचे रोमँटिक क्षण शेअर केले आहेत. या व्हिडीओत ते रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, हे मी माझ्या खास व्यक्तीसोबत करते..या प्रवासात माझी आवडती व्यक्ती माझ्यासोबत आहे याचा आनंद आहे.
हृताने तिचा प्रियकर प्रतीक शाहसोबत १८ मे रोजी लग्न केले. हृता आणि प्रतीकच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या दोघांच्या रोमँटिक फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. प्रतीक हा हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा लेक आहे. त्याने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
हृता दुर्गुळे छोट्या पडद्यानंतर आता रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती अनन्या आणि टाईमापास ३ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.