सानिका-कार्तिकच्या लग्नाचं सत्य येणार समोर; दिपू आणि इंद्रामध्ये पुन्हा निर्माण होणार गैरसमज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2022 16:10 IST2022-02-27T16:10:12+5:302022-02-27T16:10:53+5:30
Man udu udu zal :सानिका कार्तिकसोबत पळून गेल्यानंतर ते एकमेकांशी लग्न करतात. हे सत्य इंद्राला माहित असतं. परंतु, तो दिपूला या गोष्टीपासून अनभिज्ञ ठेवतो.

सानिका-कार्तिकच्या लग्नाचं सत्य येणार समोर; दिपू आणि इंद्रामध्ये पुन्हा निर्माण होणार गैरसमज?
'मन उडू उडू झालं' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अनेक अडीअडचणींवर मात करत दिपू आणि इंद्र यांच्यातील मतभेद, गैरसमज दूर झाले आहेत. मात्र, आता या दोघांच्या नात्यात पुन्हा गैरसमज निर्माण होणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी कार्तिक आणि सानिका या वादाला कारणीभूत ठरणार आहेत.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सानिकाला लग्नासाठी पाहायला माणसं येतात. यावेळी दिपू तिला बोलवायला जाते. परंतु, सानिका गळ्यात मंगळसूत्र वगैरे घालून बसलेली असते. इतकंच नाही तर माझं लग्न झालं आहे आणि हे इंद्राला माहितीये असं दिपूला सांगते. सानिकाचं हे वाक्य ऐकल्यावर दिपूला धक्का बसतो.
दरम्यान, सानिका कार्तिकसोबत पळून गेल्यानंतर ते एकमेकांशी लग्न करतात. हे सत्य इंद्राला माहित असतं. परंतु, तो दिपूला या गोष्टीपासून अनभिज्ञ ठेवतो. त्यामुळे इंद्राने एवढी मोठी गोष्ट लपवल्याचं दिपू समोर आल्यानंतर त्यांच्यात पुन्हा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या मालिकेत काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे.