काल साखरपुडा, आज लग्न...! 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याच्या लग्नाचा फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 18:25 IST2023-01-27T18:19:00+5:302023-01-27T18:25:25+5:30
Man Udu Udu Zal Fame Actor Ruturaj Phadke : इंद्राचा लाडका भाऊ अडकला लग्नबंधनात...

काल साखरपुडा, आज लग्न...! 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याच्या लग्नाचा फोटो व्हायरल
Man Udu Udu Zal Fame Actor Ruturaj Phadke : 'मन उडू उडू झालं' या लोकप्रिय मालिकेत इंद्राच्या भावाची भूमिका साकारणारा अभिनेता ऋतुराज फडके नुकताच लग्नबंधनात अडकला. होय, झट मंगनी, पट ब्याह असंच काहीसं त्याच्याबाबतीत घडलं. काल (२६ जानेवारी) ऋतुराजचा साखरपुडा पार पडला आणि आज (२७ जानेवारी) ऋतुराज लग्नबंधनात अडकला. सध्या ऋतुराजवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
ऋतुराजच्या पत्नीचं नाव प्रिती असं आहे. ऋतुराजने आज प्रीतीसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. त्याच्या लग्नाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निमिश कुलकर्णीने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ऋतुराजच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. निमिशने फोटो शेअर करत ऋतुराजला शुभेच्छा दिल्या आहेत.
झी मराठीवरील 'मन उडू उडू झालं' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. काही महिन्यांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र आजही प्रेक्षक या मालिकेतील कलाकारांना विसरू शकलेले नाही. मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली. मालिकेत ऋतुराजने कार्तिकची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी ऋतुराज फडकेने 'झोलझाल' या मराठी सिनेमामध्ये काम केलं होतं.